माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रारदार ऍड. जयश्री पाटील यांचा ईडी अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला

मुंबई  : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणा-या, तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांचा ईडी(ED) अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला. सुमारे चार तास हा जबाब नोंदवण्यात आला.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Parambir Singh)यांनी खंडणी तसेच लाचखोरीचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना बार, पब यांच्या चालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असा आरोप करत ऍड. पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायलयात जनहित याचिकेचवरील सुनावणीत न्यायालयाने सीबीआयला चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.

हा गुन्हा शंभर कोटी रूपयांचा असल्याने आता ईडीने तपासासाठी घेतला आहे. त्यावर ईडीने(ED) स्वतंत्र त्यांचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात जयश्री पाटील या मूळ तक्रारदार याचिकाकर्त्या आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी जयश्री पाटील यांना चार तास चौकशी करीता बोलावले होते.

 सर्व प्रश्नांची उत्तरे, पुरावे दिले( All questions answered, evidence given)

या वेळी माध्यामांना माहिती देताना जयश्री पाटील म्हणाल्या की, मला प्रश्न उत्तर स्वरूपात माहिती विचारण्यात आली. मी त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिलीत. अनेक पुरावे दिलेत. ज्या लोकांकडून पैसे गोळा केले जात होते त्यांची माहिती दिली आहे.  आज माझा जबाब पूर्ण झालेला नाही. मला पुन्हा बोलावले जाणार आहे. त्यावेळी पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी हजर राहणार आहे.

The complainant, who has demanded a CBI probe against former state home minister Anil Deshmukh, added. Jayashree Patil’s statement was recorded by ED officials. The statement was recorded for about four hours.

 

राज्यात म्यूकर मायकोसिस या रोगामुळे ९० जणांचा मृत्यू

म्युकर मायकोसिसचे राज्यात पंधराशे रूग्ण; पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

 

Social Media