सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ!

मुंबई : भारतातील बाजारात गुरूवारी सकाळी सोन्या-चांदीच्या भावात थोडासा बदल दिसून आला. इंडिया बुलियन एँड ज्वेलरी असोसिएशनच्या म्हणण्यानुसार आज २४ कॅरट सोन्याची किंमत ४८,५९३ वर पोहोचली आहे. तर बुधवारी २४ कॅरट सोन्याची किंमत ४८,१७७ एवढी होती. तसेच, चांदीच्या किंमतीत देखील वाढ दिसून आली.

बुधवारच्या तुलनेत चांदीच्या किंमतीत ४७५ रूपये प्रती किलोने वाढ झाली. इंडिया बुलियन एँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अधिकृत वेबसाइट (ibjarates.com) च्या मते, आज एक किलो चांदीच्या किंमतीत वाढ होऊन ७१,५७५ एवढी झाली आहे. बुधवारी चांदीचा भाव ७११०० एवढा होता.

बुधवारी संध्याकाळी ५ वाजता २४ कॅरट सोन्याची किंमत ४८,१७७ रूपये प्रती दहा ग्रॅम तर, ९९९ शुद्ध चांदीची किंमत कमी होऊन ७१,१०० प्रती रूपयांवर आली. मंगळवारी संध्याकाळी २४ कॅरट सोन्याची किंमत ४८४१९ रूपये प्रती १० ग्रॅम एवढी होती तर, ९९९ शुद्ध चांदीची किंमत प्रति किलो ७३१६८ रुपये होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीच्या वाढीसह मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव ३३३ रूपये वाढून ४७,८३३ रूपये प्रती दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदीत वाढ होऊन ७३,१६८ रूपये प्रती किलोवर बंद झाले. याआधी सोमवारी चांदीचा भाव ७१,१०१ रूपये एवढा होता.

Gold-Silver Price Today. Rise in gold and silver prices.

जपान च्या सॉफ्टबँक आणि भारताच्या भारती समुहाकडून एसबी एनर्जी इंडिया ताब्यात घेणार

भारतीय रिन्यूएबल ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा करार; ‘या’ कंपनीला खरेदी करणार अदानी ग्रीन

Social Media