नवी दिल्ली : Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर मार्केट वेगाने सुरू झाले. बीएसई सेन्सेक्स जवळपास ३५० अंकांनी वाढून 49,913 अंकांवर व्यापार करीत होता. तर याची सुरूवात ४९,८३३ अंकांवर झाली. पॉवरग्रीड Powergrid सोडलं तर इतर शेअर्समध्ये चांगलीच तेजी दिसून आली. एनएसई (NSE)चा निफ्टी 50 देखील सुमारे 15,000 च्या आसपास व्यापार करीत होता.
सेन्सेक्सची धमाकेदार सुरुवात ‘या’ शेअर्समध्ये झाली वाढ!
Sensex starts with a bang These shares rose!
यापूर्वी गुरूवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचे दिसून आले. आणि बीएसई सेन्सेक्स ३३८ अंकांनी खाली आला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या मागील बैठकीचा तपशील मिळाल्यानंतर जागतिक बाजारपेठेतील चिंतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर बाजारही खाली आले. बैठकीच्या तपशीलात बाँड खरेदी प्रकरणात कोमलता आणण्याबाबत चर्चा करण्यात आली. ३० शेअर्सवर आधारित बीएसई सेन्सेक्स( BSE Sensex )३३७.७८ अंकांनी म्हणजेच ०.६८ टक्क्यांच्या घसरणीसह ४९,५६४.८६ वर बंद झाला. अशाप्रकारे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी देखील १२४.१० अंक म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी घसरून 14,906.05 वर बंद झाला.
सेन्सेक्स शेयर्समध्ये सर्वाधिक घसरण ओएनजीसीची झाली. त्यात २.७० टक्क्यांनी घट झाली. याशिवाय सन फार्मा, पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, कोटक बँक आणि नेस्ले इंडिया यांच्या शेअर्स मध्येही घसरण दिसून आली. दुसरीकडे महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक, टायटन, एल ऍण्ड टी, बजाज फिनसर्व्ह आणि इन्फोसिससह इतर शेअर्समध्ये नफा झाल्याचे दिसून आले. यामध्ये २.४७ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या म्हणण्यानुसार, कमकुवत जागतिक कल आणि देशांतर्गत निर्देशकांच्या अभावामुळे शेअर बाजारात घसरण झाली.
Share Market opened sharply on the last trading day of the week. BSE Sensex was trading at 49,913 points, up nearly 350 points. The NSE Nifty 50 of NSE was also trading around 15,000.