‘तौक्ते’ वादळामुळे बोनी कपूर यांना करोडोचे नुकसान!

नवी दिल्ली : Tauktae Cyclone : आलिकडेच देशात आलेल्या तौक्ते वादळामुळे (cyclone Tauktae) कर्नाटक, केरळ, गोवा, महाराष्ट्र, आणि गुजरातमध्ये खूप नुकसान झाले आहे. चांगली बाब म्हणजे या वादळामुळे अधिक जीवित हानी झाली नाही, परंतु मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कित्येक कोटींची संपत्ती उध्वस्त झाली आहे. यामध्ये काही चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे सेट यांचा देखील समावेश आहे. चित्रपट अभिनेता अजय देवगणचा अगामी चित्रपट ‘मैदान’ च्या सेटला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिस्थिती अशी आहे की चित्रपटाचे निर्माता बोनी कपूर यांना सेट पुन्हा तयार करावा लागेल आणि बोनी कपूर यांच्या ‘मैदान’ चित्रपटचा सेट बनवण्याची ही तिसरी वेळ आहे.

अलिकडेच याबाबत बोनी कपूर यांनी माध्यमांना सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की, सेट पूर्णपणे उध्वस्त झाला आहे आम्हाला हे तिसऱ्यांदा तयार करावे लागणार आहे. आम्हाला पहिल्यांदा सेट लॉकडाऊनमुळे तोडावा लागला होता, आम्हाला पुन्हा एकदा सेट तयार करावा लागला आणि पुन्हा लॉकडाऊन झाले. जर लॉकडाऊन झाले नसते तर आतापर्यंत चित्रीकरण पुर्ण झाले असते. क्युरेटरने आम्हाला आश्वासन दिले आहे की ते पुन्हा सेट तयार करण्यास आम्हाला मदत करतील. परंतु आम्ही याआधीच ३० कोटी रूपये खर्च केले आहेत आणि काम देखील पूर्ण झालेले नाही.

‘मैदान’ चित्रपटाच्या सेट व्यतिरिक्त सलमान खान कैटरिना कैफ यांचा चित्रपट ‘टायगर ३’ च्या सेट ला देखील नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा चित्रपट ‘निर्माणाधीन घर’ आणि टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलात है’ चा सेटचा देखील यात समावेश आहे.

Bonnie Kapoor’s loss of crores from Tauktae Cyclone, will have to be set for the third time to set ‘Maidan’

श्रीमंत असाल तर गरीबांकडे भीक मागू नका –

जर तुम्ही श्रीमंत असाल तर गरीबांकडे भीक मागू नका : कंगना रणावत

Social Media