Beauty Tips :‘या’ जादुई टिप्सच्या मदतीने स्वत:ला बनवा अधिक तरूण!

तरूण त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

मुंबई: आजच्या काळात प्रत्येक महिला स्वतःला तरूण दर्शविण्यासाठी अनेक उपाय करते. महिला टाइट आणि डाग नसलेली त्वचा मिळविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. तथापि अनियमित जीवनशैली, प्रदूषित हवा आणि सुर्याची हानिकारक किरणे त्वचेला नियमित खराब करतात. त्यामुळे केवळ नैसर्गिक चमक कमी होत नाही तर, यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या देखील दिसू लागतात. महागड्या सौंदर्य प्रसाधनांपैकी बहूतांश प्रसाधनांमध्ये केमिकल्स भरपूर प्रमाणात असतात. जे दीर्घकाळापर्यंत तुमच्या त्वचेला हानी पोहचवू शकतात. अशा परिस्थितीत प्रश्न असा आहे की स्वच्छ आणि टवटवीत त्वचेसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता आहे? आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय आणले आहेत ज्यामुळे तुमची त्वचा कोणत्याही केमिकल्सशिवाय तरुण बनण्यास मदत होते.

गुलाब पाण्याचा वापर Rose water tightens the skin :

घरगुती-उपाय!

सुंदर त्वचेसाठी या ब्यूटी टिप्स फायदेशीर! – 

ग्लायकोलिक ऍसिडचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी – 

टाइट आणि ग्लोइंग (चमकदार) त्वचेसाठी थोडेसे गुलाबपाणी देखील पुरेसे आहे. गुलाबपाणी चेहऱ्यावर डीप क्लींजर म्हणून काम करते. हे त्वचेच्या बंद छिद्रांमध्ये असलेली धूळ आणि घाण साफ करते. याव्यतिरिक्त गुलाबपाणी डोळ्यांखालील सूज कमी करण्यास देखील मदत करते. ज्यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसत नाही. एका वाटीमध्ये २ चमचे गुलाबपाणी, ग्लिसरीनचे काही थेंब आणि ½ छोटा चमच लिंबाचे रस घ्या. सर्व वस्तू एकत्र करून कॉटनने ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा.

लिंबाचे रस Lemon juice works like anti-aging :

लिंबूवर्गीय-फळे

लिंबामध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. जे एक एँटीऑक्सीडंट आहे. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे आपल्या त्वचेवर एँटी-एजिंग म्हणून कार्य करते. याशिवाय लिंबू त्वचेवर ब्लीच करण्यास देखील मदत करते. आपल्या चेहऱ्यावरील केस हलके कऱण्यास देखील फायदेशिर आहे. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसते.

काकडी आणि दही (Cucumber and yogurt exfoliate the skin) :

Cucumber-and-yogurt

ताज्या आणि तरूण त्वचेसाठी नियमितरित्या त्वचेला एक्सफोलिएट कऱण्याची आवश्यकता असते. दही आणि काकडी एक्सफोलिएट करण्यासाठी आणि मृत त्वचेवरील पेशी नष्ट करण्यासाठी चांगले कार्य करते. दह्यामध्ये लॅक्टीक ऍसिड असते, जे त्वचेला स्वच्छ करते आणि काकडी त्वचेला आराम देण्यास मदत करते.
There are some home remedies that can help to make your skin young without any chemicals.


अक्रोड फेसपॅक लावल्याने त्वचा बनते चमकदार –

Beauty Tips :चमकदार त्वचेसाठी १५ दिवसांतून एकदा नक्की वापरा अक्रोड फेसपॅक

Social Media