मनाली-काझा : चंद्रताल तलाव लवकरच पर्यटकांसाठी खुले

मनाली : बीआरओ(BRO) ने मनाली-काझा मार्ग (Manali-Kaza route)सोमवारी रात्री उशीरा पूर्ववरत केला आहे. बीआरओ ला यावेळी २० दिवस आधी मार्ग पूर्ववत करण्यात यश आले आहे. १५ हजार फूट उंच कुंजुम पासच्या जीर्णोद्धारानंतर स्पिती घाट सात महिन्यानंतर जिल्हा मुख्यालय केलंगला जोडले गेले आहे. ग्रांफूकडून कुंजुमकडे जाणाऱ्या बीआरओ च्या ९४ आरसीसी मंगळवारी काझाहून येणाऱ्या १०८ आरसीसी संघाला मिळाले आहे. हा मार्ग पूर्ववत झाल्यानंतर पर्यटक आता ऐतिहासिक चंद्रताल तलावाचे दर्शन करू शकतील. तथापि कोरोना संकटामुळे सध्या व्यवसाय मंद आहे. परंतु परिस्थिती सामान्य झाल्यानंतर चंद्रताल तलाव पर्यटकांसाठी खुले केले जाईल.

राजगीर शहरातील नेचर सफारी हा पर्यटनासाठी उत्तम पर्याय! – 

नोव्हेंबरपासून बंद असलेला हा मार्ग सात महिन्यानंतर लाहूल खोऱ्यासह पर्यटन नगरी मनालीला जोडला गेलेला आहे. हा मार्ग पूर्ववत झाल्यानंतर जगातील टॉप टेन टूरिस्ट डेस्टिनेशन (जगातील पहिले दहा पर्यटन स्थळ) मध्ये स्पिती घाट देखील मनालीला जोडला गेला आहे. सुरूवातीच्या दिवसांमध्ये प्रवास जपून करावा लागेल. छोट्या वाहनचालकांनी सुरूवातीला तिथे जाण्याची जोखीम घेऊ नये. हिवाळ्यात कमी बर्फवृष्टी असल्यामुळे बीआरओने स्पिती च्या लोसर गावाला संपूर्ण हिवाळ्यासाठी पूर्ववत ठेवले. परंतु एप्रिल-मेच्या हिमवृष्टीने बीआरओची समस्या वाढविली.

बीआरओचे कमांडर कर्नल उमा शंकर यांनी सांगितले की, कुंजुम पासचे दोन्ही टोक एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यांनी सांगितले की, ग्रांफू समडो मार्गावर लवकरच वाहनांची हालचाल सुरळीत होईल. त्यांनी लोकांना अवाहन केले की काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली नाही तसेच बर्फ हटविण्याचे थोडेसे काम बाकी आहे. त्यांनी वाहन चालकांना अवाहन केले आहे की वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील, त्यामुळे अधिक घाई करू नये.
The BRO has restored the Manali-Kaza route late Monday night. The BRO has succeeded in restoring the route 20 days earlier this time. Tourists will now be able to see the historic Chandratal lake.


‘वॅक्सीन पर्यटन’ गेल्या वर्षापासून ट्रेंडमध्ये आले आहे –

कोरोना काळात मंदीवर मात करण्यासाठी रशिया, अमेरिका देत आहे ‘वॅक्सीन टूरिझम’ची ऑफर!

Social Media