एसबीआय खातेदारांना धक्का! नवीन नियम १ जुलैपासून लागू..

नवी दिल्ली : SBI New Service Charges: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लाखो ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय ने बेसिक सेव्हिंग्ज बँक खात्याशी (बीएसबीडी मूलभूत बचत बँक खाते) संबंधित अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. या नियमांच्या बदलानंतर चेकबुक आणि रोख रक्कम काढण्यासाठी आता शुल्क द्यावे लागणार आहे. एसबीआय चे हे नवीन नियम १ जुलै २०२१ पासून लागू होतील. झिरो बॅलन्स असणारे बेसिक सेव्हिंग्ज खाते(BSBD) गरीबांसाठी उघडले जाते, आता त्यांना देखील अनेक सेवांसाठी शुल्क द्यावे लागेल.

खातेधारक एटीएम किंवा शाखेतून महिन्यातून चार वेळा कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढू शकतील

Account holders will be able to withdraw money from ATMs or branches four times a month at no charge

१ जुलैपासून बेसिक सेव्हिंग्ज बँक ठेव खातेधारक एटीएम किंवा शाखेतून महिन्यातून चार वेळा कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढू शकतील, त्यानंतर बँक पैसे काढण्याऱ्या खातेदारांकडून शुल्क आकारेल, जरी पैसे एसबीआय च्या एटीएम मधून काढले किंवा इतर बँकेच्या एटीएम मधून तरी देखील शुल्क आकारले जाईल. हे शुल्क प्रती ट्रान्झॅक्शन १५ रूपये आणि जीएसटी द्यावा लागेल.

बेसिक सेव्हिंग्ज बँक ठेव खातेदारांना वर्षातून एकदाच चेकबुक विनामुल्य मिळेल ज्यामध्ये १० चेक असतील, त्यानंतर १० चेक असणारे नवीन चेकबुक हवे असल्यास ४० रूपये आणि जीएसटी शुल्क भरावा लागेल. जर २५ चेक असणारे नवीन चेकबुक हवे असल्यास ७५ रूपये आणि जीएसटी शुल्क भरावा लागेल. जर त्वरित चेकबुक हवे असल्यास १० चेक असलेल्या चेकबुकसाठी ४० रूपयांऐवजी ५० रूपये आणि जीएसटी भरावा लागेल. परंतु ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

एसबीआय आणि एसबीआय नसलेल्या बँक शाखांमध्ये बेसिक सेव्हिंग्ज बँक खातेदार जर गैर-आर्थिक व्यवहार करत असतील तर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. जर खातेधारक NEFT, RTGS (एनईएफटी, आरटीजीएस) सारख्या माध्यमांद्वारे व्यवहार करत असतील तरी यावर शुल्क आकारले जाणार नाही.
Government Bank SBI has changed many rules related to Basic Saving Bank Account (BSBD).


बाजार भांडवल ३ ट्रिलियनच्या पुढे..

सोन्यात पुन्हा गुंतवणूक करण्याची सरकारची नवीन योजना! –

सरकारने जनतेला दिली स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी!

Social Media