White Fungusमुळे आतड्यांना छिद्र पडण्याचे जगातील पहिले प्रकरण आले समोर !

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संक्रमित रूग्णामध्ये पाढऱ्या बुरशीमुळे (White Fungus) लहान आतडे आणि मोठ्या आतड्यात छिंद्र निर्माण झाल्याचे जगातील पहिले प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील नामांकित सर गंगा राम रूग्णालयात एक ४९ वर्षीय महिलेत हा आजार दिसून आला आहे. यामुळे या महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यानंतर उपचार सुरू असताना तिच्या पोटात नळी टाकून सुमारे एक लीटर द्रव्य काढण्यात आले. उपचार सुरू आहेत आणि सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. असे म्हटले जात आहे की या महिलेला गेल्या आठवड्यात १३ मे २०२१ रोजी सर गंगा राम रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते.

पोटात असह्य वेदना होण्याची तक्रार

Complaint of unbearable pain in stomach

 White-fungus

तपासणी दरम्यान महिलेने पोटात असह्य वेदना होण्याची तक्रार केली होती, त्यानंतर तपासणीत असे दिसून आले की महिलेला उलट्यांसह बद्धकोष्टतेचा देखील त्रास होता, असेही दिसून आले की काही काळापूर्वी त्या महिलेचा कर्करोगामुळे एक स्तन देखील काढून टाकण्यात आला होता आणि चार आठवड्यांपूर्वी केमोथेरपी करण्यात आली होती. तर, सध्या रूग्ण शस्त्रक्रियेनंतर ठीक आहे आणि काही दिवसानंतर त्या महिलेला रूग्णालयातून सुट्टी दिली जाईल. सर गंगा राम रूग्णालयाच्या ऍडव्हायझर, डिपार्टमेंट ऑफ सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी ऍण्ड लिव्हर ट्रान्सप्लांटेशन चे डॉ. (प्रो.) समीरन नंदी यांच्या म्हणण्यानुसार, या महिलेवर ४ तास शस्त्रक्रिया करण्यात आली, त्या दरम्यान आतड्याचा एक तुकडा बायोप्सीसाठी पाठविण्यात आला.

मॉडर्न कपंनीची पहिली लस ९३ टक्के प्रभावी – 

बायोप्सी च्या निदानानंतर असे दिसून आले की आतड्यांमध्ये व्हाईट फंगस (White Fungus)आहे. तसेच रूग्णाच्या कोव्हिड-१९ (Covid-19)ची पातळीही अधिक होती. डॉ. अनिल अरोडा यांच्या मते स्टेरॉइड च्या वापरानंतर ब्लॅक फंगसद्वारे (black fungus)आतड्यांमध्ये छिंद्र पडण्याची काही प्रकरणे अलिकडेच समोर आली आहेत परंतु, व्हाईट फंगसद्वारे छिंद्र पडण्याचे प्रकरण हे जगभरातील पहिलेच आहे.

White Fungus DENGER! White fungus pierces woman’s intestines, world’s first case revealed in Delhi hospital


मॉडर्न कपंनीची पहिली लस ९३ टक्के प्रभावी –

मॉडर्न कंपनीची लस मुलांसाठी शंभर टक्के सुरक्षित आणि प्रभावी!

Social Media