दाक्षिणात्य अभिनेता प्रभास ‘मिशन इम्पॉसिबल 7’ मध्ये असल्याच्या चर्चांना उधान!

मुंबई: साउथचा सुपरस्टार प्रभास सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. वास्तविक, बुधवारी समूह माध्यमांवर अशी चर्चा रंगली होती की ‘बाहुबली’ अभिनेता प्रभास टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रभासने चित्रपटाच्या दिग्दर्शकाची भेट घेतली आहे.

प्रभास ‘मिशन इम्पॉसिबल 7’ चित्रपटात असल्याच्या चर्चांवर दिग्दर्शक किस्तोफर मॅक्वेरी यांची प्रतिक्रिया!

Director Kistofer McQueary reacts to discussions that Prabhas is in ‘Mission Impossible 7’!

प्रभास सध्या इटलीमध्ये त्याच्या अगामी चित्रपट ‘राधे श्याम’ च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. आता दिग्दर्शक किस्तोफर मॅक्वेरी यांनी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना प्रभासच्या चित्रपटातील उपस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एका चाहत्याने किस्तोफर मॅक्वेरी यांना प्रश्न करताना म्हटले आहे की प्रभास ‘मिशन इम्पॉसिबल 7’ मध्ये असल्याची चर्चा वेगाने पसरत आहे. यावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शकाने लिहिले आहे की, ‘मला माहित आहे की तो खूप चांगला अभिनेता आहे, परंतु आम्ही कधीच भेटलेलो नाही. इंटरनेटवर आपले स्वागत आहे.’

प्रभासच्या अगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर तो ‘आदिपुरुष’, ‘राधे श्याम’ आणि दिग्दर्शक नाग आश्विन यांच्या ‘सायन्स फिक्शन’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.
South’s superstar Prabhas is currently a social media sensation. Actually, there was a buzz on social media on Wednesday that ‘Baahubali’ actor Prabhas will be seen in the lead role in Tom Cruise’s ‘Mission Impossible 7’


जी-इंटरटेन्मेंट इंटरप्राइजेसकडे चित्रपट प्रदर्शित करणाऱ्याचे विशेष अधिकार –

‘राधे’ चित्रपटासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिला मोठा आदेश!

Social Media