मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या आणि ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अटक केले आहे. सिद्धार्थ पिठानी सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या चार लोकांपैकी एक होता. सिद्धार्थला हैद्राबादहून अटक करण्यात आली असून मुंबईत आणण्यात आले आहे.
सिद्धार्थ पिठानीचा गेल्याच आठवड्यात साखरपुडा झाला आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर सिद्धार्थ पिठानीचे देखील नाव माध्यमांमध्ये चर्चेत होते. सिद्धार्थनेच सुशांतचा मृतदेह सर्वप्रथम घरात पंख्याला लटकलेला पाहिला होता. त्यानंतर त्याने पोलीस आणि रूग्णालयात फोन केला होता.
एनसीबीचे अधिकारी आता सिद्धार्थ पिठानीची ड्रग्स प्रकरणाबाबत चौकशी करतील
NCB officials will now interrogate Siddharth Pithani in a drug case
एनसीबीचे अधिकारी आता सिद्धार्थ पिठानीची ड्रग्स प्रकरणाबाबात चौकशी करतील. क्रिएटिव्ह आर्ट डिझायनर सिद्धार्थ पीठानी सुशांतच्या त्या चार मित्रांपैकी सर्वात जवळचा होता. जेव्हा सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती घरात नसायची तेव्हा सुशांत च्या समोरील खोलीत तो रहायचा. सीबीआयने आपल्या तपासात अनेक लोकांची चौकशी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात चार नावे सर्वात महत्वाची आहेत.
सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, नोकर नीरज सिंग, हाऊस मॅनेजमेंटचे काम पाहणारा दिपेश सावंत आणि त्याचा कुक केशव. आत्महत्येच्या घटनास्थळी हे चौघेजण उपस्थित होते. मुंबई पोलीस आणि सीबीआय ने या चौघांची अनेकवेळा दीर्घकाळापर्यंत चौकशी केली होती.
Siddharth Pithani arrested in Sushant Singh Rajput drug case, was present during the suicide of SSR
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास ‘मिशन इम्पॉसिबल 7’ मध्ये असल्याच्या चर्चांना उधान! –
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास ‘मिशन इम्पॉसिबल 7’ मध्ये असल्याच्या चर्चांना उधान!
जी-इंटरटेन्मेंट इंटरप्राइजेसकडे चित्रपट प्रदर्शित करणाऱ्याचे विशेष अधिकार –