२०२१ मध्ये २००० चलनी नोटांचा पुरवठा कमी : आरबीआय

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI)काल जाहीर झालेल्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, मागील वर्षाप्रमाणेच वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये २,००० रूपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा झालेला नाही. रिझर्व्ह बॅँकेने गेल्या वेळेला २०१८-१९ मध्ये ४६७ लाख २००० रूपयांच्या नोटांचा पुरवठा केला होता. आरबीआय ने २० रूपयांच्या नोटांचा पुरवठा २०१९-२० मध्ये १३,३९० लाखांच्या नोटांवरून २०२०-२१ मध्ये ३८,२५० लाख नोटांचा पुरवठा केला आहे.

२०२०-२१ मध्ये नोटांच्या प्रस्तावात मागील वर्षाच्या तुलनेत 9.7 टक्क्यांनी घट

Note proposals decline by 9.7% in 2020-21 as compared to previous year

मूल्यानुसार, चलनातील नोटांमध्ये ५०० आणि २,००० च्या नोटांचा वाटा ८५.७ टक्के इतका आहे. प्रमाणानुसार, ३१ मार्च २०२१ पर्यंत चलनात असलेल्या नोटांमध्ये ५०० रूपयांच्या नोटांचा वाटा सर्वाधिक ३१.१ टक्के होता. त्यानंतर दहा रुपयांच्या नोटा चलनात अधिक प्रमाणात आहेत. याचा हिस्सा २३.६ टक्के इतका होता. अहवालानुसार, २०२०-२१ मध्ये नोटांच्या प्रस्तावात मागील वर्षाच्या तुलनेत 9.7 टक्क्यांनी घट झाली आहे. पुरवठा देखील मागील वर्षाच्या तुलनेत ०.३ टक्क्यांनी कमी होता.

रिझर्व्ह बॅंकेने आपले आर्थिक वर्ष जुलै ते जून बदलून एप्रिल ते मार्च केले आहे. सध्याचा वार्षिक अहवाल जुलै २०२० ते मार्च २०२१ या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, ३१ मार्च २०२१ पर्यंत चलनातील एकूण बॅंक नोटांमध्ये ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा वाटा ८५.७ टक्के होता. तर, ३१ मार्च २०२०च्या अखेरीस हा आकाडा ८३.४ टक्के होता.

केंद्रीय बॅँकेच्या २०२०-२१ च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, ‘२०२०-२१ मध्ये कोव्हिड-१९ संसर्गामुळे लोकांनी त्यांच्याकडे सावधगिरी म्हणून रोख रक्कम ठेवली, ज्यामुळे चलनातील नोटांमध्ये सरासरीपेक्षा अधिक वाढ झाली.’ रिझर्व्ह बँकेने सांगितले की अंर्थव्यवस्थेत रोख रकमेच्या वाढत्या मागणी दरम्यान बँकेने मोठी मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
RBI said – supply of 2000 notes did not happen in FY 2021, currency of 500 notes is highest after demonetisation


‘बीपीसीएल’ कंपनीचे या वित्तीय वर्षात खासगीकरण करण्याची सरकारची तयारी! –

‘बीपीसीएल’ कंपनीच्या नफ्यात ७ टक्क्यांनी वाढ, शेअरधारकांना मिळणार लाभांश

Social Media