ब्रुसेल्स : यूरोपियन मेडिसिन एजन्सीने (European Medicines Agency, EMA) १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘फायझर-बायोटेक’ कोव्हिड-१९ लस वापरण्यास मान्यता दिली आहे. फायझर-बायोटेकच्या लसीला २७ सदस्य देशांच्या यूरोपियन संघाला सर्वात प्रथम मंजूरी मिळाली होती आणि डिसेंबर मध्ये १६ वर्षिय किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना लस देण्यासाठी परवाना देण्यात आला होता. शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना यूरोपीय मेडिसिन एजन्सीचे (EMA) लस रणनीती व्यवस्थापक मार्को कॅवेलरी (Marco Cavaleri) यांनी सांगितले की, यूरोपियन संघाची नियामक मुले आणि किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला मंजूरी देण्यासाठी आवश्यक आकडेवारी मिळाली होती आणि आकडेवारीनुसार असे समजते की ही लस कोव्हिडविरूद्ध अत्यंत प्रभावी आहे.
‘ईएमए’ने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘फायझर-बायोटेक’ लसीला दिली मंजुरी!
EMA approves Pfizer-Biotech vaccine for children between the ages of 12 and 15!
त्यांनी सांगितले की, या निर्णयाला यूरोपियन आयोगाची मंजूरी मिळणे आवश्यक आहे आणि वेगवेगळ्या देशांच्या नियामकांना निश्चित करावे लागेल की १६ वर्षाखालील मुलांना लस दिली जावी किंवा नाही. कॅनडा आणि अमेरिकेतील नियामकांनी किशोरवयीन मुलांसाठी याआधीच याचा वापर करण्याची शिफारस केली होती. यूरोपीय मेडिसिन एजन्सीने सांगितले की, अमेरिकेत २,२०० पेक्षा अधिक किशोरवयीन मुलांवर झालेल्या अभ्यासाच्या आधारे असे दिसून आले आहे की ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे.
यूरोपीय मेडिसिन एजन्सीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘लस खूप सुरक्षित असल्याचे दिसून आले आणि १२ ते १५ वयोगटामध्ये देखील लसीचे दुष्परिणाम सारखेच होते जसे १६ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये आढळून आले होते आणि कोणतीच चिंतेची बाब नाही. लस दिल्यानंतर या वयोगटातील लोकांना देखील वेदना, थकवा, डोकेदुखी, स्नाय़ू आणि सांधेदुखी तसेच थंडी वाजणे आणि ताप जाणवू शकतो. ’
European Medicines Agency, EMA has approved the use of the Pfizer-BioNotech Covid-19 vaccine for children between 12 and 15 years of age.
साखरेची पातळी (शुगर लेवल) वाढल्यास ‘म्यूकरमायकोसिस’ चा धोका अधिक वाढू शकतो –