Tourism industry : पर्यटनासाठी लोकांनी निवडला ‘वर्क फ्रॉम हॉटेल’चा पर्याय!

नवी दिल्ली : घरी बसून ऑफिसची कामे करुन कंटाळलेले लोक आता घराबाहेर पडून पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासह ऑफीसचे काम करण्याच्या सोयींचा फायदा घेत आहेत. याला वर्क फ्रॉम हॉटेल (Work From Hotel) असे नाव देण्यात आले आहे.

कोरोनामुळे पर्यटन उद्योग प्रभावित (Tourism industry affected due to Corona)-
कोरोनामुळे (Coronavirus) सर्व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. यामध्ये पर्यटन (टूरिझम इंडस्ट्री) व्यवसायावर पूर्णपणे वाईट परिणाम झाला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे पर्यटनासाठी लोक आले नाहीत आणि यावर्षी देखील कोरोनामुळे पर्यटनासाठी लोक बाहेर पडले नाहीत. ज्यामुळे पर्यटन व्यवसायाशी संबंधित स्थानिक लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. परंतु घरी राहून कंटाळलेल्या लोकांनी पर्य़टन स्थळांना भेट देण्यास सुरूवात केली आहे.

पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी वर्क फ्रॉम होमनंतर आता वर्क फ्रॉम हॉटेल!

Work from home to enjoy tourist destinations now work from hotel!

Himachal : राज्यातील ९० टक्के पर्यटन व्यवसाय जूनमध्ये बँक डिफॉल्टर होईल.. – 

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनंतर ऑफिसला जाण्याऐवजी लोक घरात बसून ऑफिसचे काम करीत आहेत. घरी बसून-बसून लोक कंटाळलेले आहेत, ज्यावर लोकांनी कोव्हिडच्या नियमांचे पालन करून ‘वर्क फ्रॉम हॉटेल’ हा पर्याय निवडला आहे. वर्क फ्रॉर्म हॉटेलसाठी लोक पर्वती स्थळांची निवड करीत आहेत. मनालीमधील एका हॉटेलचे मालक सचिन गुप्ता यांनी सांगितले की, मल्टी नॅशनल कंपनीमध्ये काम करणारे अनेक लोक हॉटेल मध्ये येत आहेत आणि इथेच काम करीत आहेत.
वर्क फ्रॉम हॉटेलसाठी बहूतांश लोक दिल्ली, गुरूग्राम, चंदीगढ येथून पर्वती ठिकाणी जात आहेत. ज्यामुळे हॉटेलांचा देखील थोडासा फायदा होत आहे. हे सर्व हॉटेल्स कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून, चांगल्या इंटरनेट सुविधांसह वर्क फ्रॉम हॉटेलची सुविधा देत आहेत.
People who have been bored by doing office work sitting at home, now get out of the house and enjoy the tourist place and are taking advantage of the convenience of doing office work.


पर्यटन वाहनांच्या येण्यामुळे मनालीच्या व्यापाऱ्यांमध्ये चांगल्या व्यवसायाची आशा! –

जूनमध्ये पर्यटन व्यवसाय सुरू होण्याची आशा : अनूप ठाकूर

Social Media