मुंबई : कोरोना विषाणूमुळे मनोरंजन उद्योग(entertainment industry) पूर्णपणे प्रभावित झाला आहे. गेल्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान बंद झालेले थिएटर्स मध्यंतरी काही काळासाठी कमी प्रेक्षकांच्या उपस्थितीसह सुरू झाले होते परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा बंद ठेवण्यात आले. येत्या काळात हे सुरू होण्याची शक्यता देखील खूप कमी आहे कारण कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे नष्ट झालेली नाही आणि त्यासोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात देखील लोकांच्या मनात भीती आहे. अशा परिस्थितीत थिएटर ऐवजी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहेत. तर जाणून घेऊयात जून मध्ये कोणते चित्रपट आहेत ज्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून प्रदर्शित केले जाणार आहे.
शेरनी (Sherni)-
विद्या बालन जेव्हा एखाद्या चित्रपटासह प्रेक्षकांसमोर येते तेव्हा एक वेगळीच चर्चा रंगलेली असते. तिचा अगामी चित्रपट शेरनी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित केला जाणार असून चित्रपटात विद्या बालन वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर २ जून रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
झुंड (Jhund)-
चित्रपटाच्या प्रदर्शनाची बाब असेल तर त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव नसेल असे होऊ शकत नाही. वर्षभरात सर्वांधिक काम करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले जाते. बीग बी यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होतील परंतु यामध्ये सर्वांत पहिला नंबर झुंड सिनेमाचा आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे ज्यात बीग बी फुटबॉल प्रशिक्षक विजय बरसे यांची भूमिका साकारताना दिसून येणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. हा चित्रपट देखील जून मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
तूफान (Toofan)-
फरहान अख्तर देखील स्पोर्ट्स ड्रामा फिल्म तूफान सोबत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. हा चित्रपट पूर्वी २१ मे रोजी प्रदर्शित होणार होता परंतु कोरोनामुळे या तारखेत बदल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित केले जाईल. हा चित्रपट देखील ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होईल.
जगमे थंदिरम(Jagame Thandhiram)-
धनुषचा जगमे थंदिरम चित्रपट(Jagame Thandhiram) देशभरात चर्चेचा विषय आहे. हा चित्रपट १८ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
From Farhan Akhtar’s Toofan to Vidya Balan’s sherani, these films will be released on OTT in June.
मॉडेलद्वारे दाखल केलेल्या एफआरआय मध्ये ९ हाय प्रोफाइल व्यक्तींची नावे समाविष्ट –
जॅकी भगनानीसह बॉलिवूडच्या नऊ दिग्गजांविरूद्ध मॉडेलने केला लैंगिक छळाचा आणि अत्याचाराचा आरोप!