Beauty Tips : जाणून घ्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी पुदीन्याच्या तेलाचे फायदे……

Benefits Of Peppermint Oil: पोटाची समस्या उद्भवल्यानंतर तुम्ही अनेकवेळा हिरव्या पुदीन्याचा वापर केला असणार. तर पुदीन्याच्या चटनीद्वारे अन्नाची चव देखील वाढविली असणार तसेच याचा फेसपॅक देखील चेहऱ्यावर लावला असणार, परंतु तुम्ही कधी पुदीन्याच्या तेलाचा (Peppermint Oil) वापर आरोग्य आणि सौंदर्य वाढविण्यासाठी केला आहे का? तुम्हाला याचे फायदे (Benefits) माहित आहेत का? नसेल तर मग जाणून घेऊयात पुदीन्याचे तेल आरोग्य आणि सौंदर्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे. पुदीन्याच्या तेलाला मिंट ऑइल आणि पेपरमिंट ऑइल या नावाने देखील ओळखले जाते.

आरोग्यासाठी पुदीन्याच्या तेलाचे फायदे (Benefits of peppermint oil for health)-

डोकेदुखी कमी करते (eases headache)- पुदीन्याचे तेल डोकेदुखी दूर करण्यात उपयुक्त आहे. याचा वापर केल्याने चिंता आणि तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. सोबतच तणाव दूर करण्यात मदत होते.

रक्त परिसंचरण वाढविते (Increases blood circulation)- रक्त परिसंचरण वाढविण्यासाठी देखील पुदीन्याचे तेल खूप फायदेशीर आहे. या तेलाद्वारे त्वचेवर सर्कुलेशन मध्ये मसाज केल्याने त्यातील मेन्थॉल त्वचेत सहजरित्या शोषला जातो आणि ब्लड सर्कुलेशन वाढविण्यास मदत होते.

‘सायनोसाइटिस’पासून आराम (Gives relief from sinusitis)- ‘सायनोसाइटिस’ची समस्या दूर करण्यात देखील पुदीन्याचे तेल मदत करते. ही समस्या दूर करण्यासाठी पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब रूमालावर टाकून त्याचा वास घेतला जाऊ शकतो. याशिवाय गरम पाण्यात त्याचे काही थेंब टाकून वाफ घेतल्याने देखील साइनसची समस्या दूर होते.
ऍलर्जी आणि इन्फेक्शन दूर करणे (Removes allergies and infections)- पुदीन्याच्या तेलात एँटी-बॅक्टेरियल आणि एँटी फंगल गुणधर्म असतात. हे संसर्ग पसरविणाऱ्या बॅक्टेरिया (जीवाणू) आणि फंगस (बुरशी)ला नष्ट करण्यास मदत करते तसेच ऍलर्जी आणि इन्फेक्शन(संसर्ग) दूर करण्यास मदत करते. हे कापसाच्या मदतीने प्रभावित जागी लावल्याने आराम मिळतो.

सौंदर्यासाठी पुदीन्याच्या तेलाचे फायदे (benefits of peppermint oil for beauty)-

१. मुरूमे दूर करणे (removes acne)- पुदीन्याच्या तेलाच्या वापराने मुरूमे दूर होण्यास मदत होते. यासाठी तेल कापसाच्या मदतीने मुरूमांवर लावू शकता. यामध्ये एँटी-मायक्रोबियल आणि एँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे मुरूमांकरिता जबाबदार असलेल्या बॅक्टेरियाशी लढतात आणि चेहऱ्याची सूज देखील कमी करतात.
२. त्वचेवर चमक आणते (Brings glow to the skin)- त्वचेला चमकदार बनविण्यासाठी देखील पुदीन्याच्या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी मुल्तानी माती आणि काकाडीचा फेसपॅक बनवून त्यात काही थेंब पुदीन्याच्या तेलाचे टाकावे. त्यानंतर हे चेहऱ्यावर २० मिनिटांपर्यंत ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील निर्जीव त्वचा निघून जाईल आणि त्वचा मऊ आणि चमकदार होईल.
३. केस गळती प्रतिबंधित करते (prevents hair fall)- केस गळती रोखण्यात देखील पुदीन्याचे तेल चांगली भूमिका बजावते. यासाठी नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये काही थेंब पुदीन्याच्या तेलाचे मिसळून या तेलाने डोके आणि केसांचा मसाज करावा त्यानंतर एक-दोन तासांनी केस शाम्पूने धुवावेत.
Peppermint oil is used to enhance health and beauty. Learn how peppermint oil helps in improving both health and beauty.


सुंदर चेहऱ्यासाठी शरीरात ‘ही’ जीवनसत्वे असणे आवश्यक! –

Beauty Tips : सुंदर चेहऱ्यासाठी शरीरात ‘ही’ जीवनसत्वे असणे आवश्यक!

Social Media