रक्तातील पातळी नियंत्रित करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन….

मुंबई : एका अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू मधूमेहामुळे (diabetes) होतो. वाईट जीवनशैली, चुकीचा आहार, गोड पदार्थांच्या अधिक सेवनासह काही लोकांना अनुवंशिकरित्या हा आजार होतो. आजच्या काळात केवळ वृद्धच नव्हे तर लहान मुले देखील रक्त साखरेला (Blood Sugar) बळी पडत आहेत.

मेधूमेह एक असा जुनाट आजार आहे, ज्याला वेळेत नियंत्रित केले नाही तर, डोळे, मेंदू तसेच शरीरातील इतर अवयवांवर वाईट परिणाम होतो. मधूमेहाची समस्या नियंत्रित करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. याद्वारे देखील तुम्हाला फायदा होईल. काही अशा गोष्टींबाबात जाणून घेऊयात ज्याचे सेवन केल्याने वेगाने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होईल.

कोरफड (Aloe vera)-

औषधी गुणधर्म भरपूर असलेले कोरफड त्वचेसह आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. ऍलोव्हेरा मध्ये एँटीऑक्सीडंट(antioxidant) गुणधर्म आढळतो, जो स्वादुपिंडातील बीटा पेशींचे संरक्षण आणि दुरुस्ती करण्यात मदत करू शकतो आणि इन्सुलिनचे उत्पादन देखील करतो. त्यामुळे दररोज सकाळी रिकाम्या पोटी ऍलोव्हेरा ज्यूस प्यावे.

मेथी (Fenugreek)-

मेथीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त फायबर, प्रोटीन, स्टार्च, शुगर, फॉस्फेरिक ऍसिड यासारखे पौष्टिक घटक आढळतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. मेथीचे सेवन करण्यासाठी रात्री एका ग्लास पाण्यात एक चमचा मेथी भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी याचे पाणी प्या. याशिवाय तुम्ही मेथीला मोड अल्यानंतर त्याचे सेवन करू शकता.

आले (ginger)-

आल्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर देखील नियंत्रित केली जाऊ शकते. कारण यामध्ये असे गुणधर्म आढळतात जे शरीरात इन्युलिनचे प्रमाण वाढवितात. याचे सेवन तुम्ही आल्याचा चहा घेऊन करू शकता. याव्यतिरिक्त आल्याची पावडर किंवा त्याचे कच्चेच सेवन करू शकता.
Diabetes patients should consume these things on an empty stomach, blood sugar level will be controlled naturally.


‘डेल्टा’ व्हेरिएंटची प्रकरणे वाढत असल्याने डब्ल्यूएचओ चिंतीत! –

जगाला आता ‘बी.१.६१७’च्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका; डब्ल्यूएचओचा अभ्यास सुरू…..

Social Media