मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर लादून जनतेचे खिसे कापत आहे. या अन्यायी जुलमी, अत्याचारी दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आज राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला आहे. मोदी सरकारने ही जुलमी करवसुली कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्ष यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील पेट्रोल पंपावर इंधन आणि गॅस दरवाढी विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव रविंद्र दरेकर, राजा तिडके, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी आदी उपस्थित होते.
इंधनावरील भरमसाठ करवाढीतून मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा.
Modi government robs people of pockets of heavy fuel tax hike.
वडसा येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कोरोनाने दीड वर्षापासून लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे, उद्योग धंदे बंद आहेत, लाखो लोकांचे रोजगार गेले, कठीण परिस्थितीत लोक जगत असताना त्यात इंधन दरवाढ व महागाईने लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंह यांनी इंधनाच्या महागाईची झळ लोकांना बसू नये म्हणून दर स्थिर ठेवून जनतेला दिलासा होता परंतु मोदी सरकार मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव कमी असतानाही भरमसाठ कररुपाने लोकांच्या खिशावर दरोडे टाकून नफेखोरी करत आहे.
राज्यव्यापी आंदोलनात ठाणे येथे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत शिंदे, रविंद्र आंग्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधील ३५ पेट्रोल पंपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कसबा विधानसभा मतदारसंघातील कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक, सांगली, अहमदनगर, नांदेड, मालवण, अमरावती, सावंतवाडी, कणकवली, बुलढाणा, नांदेड, औरंगाबाद यासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
राज्यातील एक हजार पेट्रोल पंपांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकाचवेळी आंदोलन करुन इंधन दरवाढीचा तीव्र निषेध केला. यावेळी मोदी सरकार जुलमी दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा आरक्षण प्रकरणी पूनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस; अशोक चव्हाण यांची माहिती –
मराठा आरक्षण प्रकरणी पूनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस; अशोक चव्हाण यांची माहिती