कोरोना काळात कॅम्पिंगचा आनंद घेण्यासाठी गोव्यातील ‘ही’ ठिकाणे सर्वात सुरक्षित!

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन आहे. यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यात मदत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमितांच्या संख्येत वेगाने घट झाली असून देशभरात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. या दरम्यान लोकांमध्ये आशेचा किरण दिसून येत आहे. विशेषतः पर्यटकांचे संपूर्ण लक्ष गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांकडे लागले आहे. तज्ञांच्या मते परिस्थिती सामान्य झाल्यास सर्व पर्यटन स्थळांना खुले केले जाईल. पर्यटक आवश्यक खबरदारी घेऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. जर तुम्हालाही कॅम्पिंगची आवड असेल आणि कोरोना काळात सुरक्षित कॅम्पिंग करायचे असेल तर गोव्यातील या ठिकाणांची यात्रा तुम्ही करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात त्या ठिकाणांविषयीची माहिती….

सध्या कॅम्पिंग करण्याचा कल अधिक आहे. निसर्गाचा जवळून आनंद घेण्यासाठी लोक कॅम्पिंग करतात. यामध्ये लोक एका ठिकाणी तळ ठोकून अनेक दिवसांपर्यंत राहतात आणि यात्रेचा आनंद घेऊन जवळील ठिकानांना भेट देतात. तुम्ही कॅम्पिंगसाठी तालपोना बीचवर जाऊ शकता. हे बीच गोव्यापासून केवळ ७ किलोमीटर दूर आहे. या बीचवर खूप कमी गर्दी असते, त्यामुळे कोरोना काळात हा सर्वात सुरक्षित बीच आहे. या बीचवर नैसर्गिक गोष्टींचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

पणजी (panaji)-

पणजी गोव्यातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. जर तुम्हाला गोव्याचे सौंदर्य जवळून पहायचे असेल तर पणजीमध्ये कॅम्पिंग करू शकता. येथे संपूर्ण गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्यांचा आनंद घेता येता.

अंजुना बीच (Anjuna beach)-

अंजुना बीच कॅम्पिंगसाठी सर्वोंत्तम ठिकाण आहे. मोठ्या संख्येने पर्यटक अंजुना बीचवर कॅम्पिंगसाठी येतात. येथे तुम्हाला तंबूची सुविधा देखील मिळते.
These are the safest places in Goa for camping during the Corona period, definitely visit once.


कैलास मानसरोवर यात्रा आणि भारत-चीन व्यापार देखील ठप्प! –

पर्यटक न आल्याने उच्च हिमालय पडले ओसाड, कैलास मानसरोवर यात्रा आणि भारत-चीन व्यापार देखील ठप्प!

Himachal Tourism : राज्यातील अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राची सुमारे १० टक्के भागीदारी. –

Himachal Tourism : हिमाचलमध्ये पर्यटनासाठी प्रवेश सुरू होण्याची शक्यता….

Social Media