हल्दवाणी Uttarakhand tourism : यावर्षी देखील पर्वतीय पर्यटन व्यवसाय घसरला आहे. यावेळी पर्यटन(tourism) व्यवसाय आपल्या शिखरावर असायला हवा होता, परंतु कोव्हिडमुळे पर्यटन व्यवसाय तोट्याच्या दिशेने गेला आहे. पर्यटन व्यवसायिकांच्या मते, यावर्षी पर्यटनाशी संबंधित अपेक्षा भंग झाल्या आहेत. आता पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे पर्यटन व्यवसाय वाढणे अवघड आहे. हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायिकांच्या मते, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला खूप मोठा फायदा व्हायचा, परंतु, पर्वतीय पर्यटन थांबले आहे. जर हा हंगाम गेला तर पर्यटन व्यवसायाच्या बाबतीत काहीही शिल्लक राहिले नाही. अपेक्षा केली जात होती की, मागील वर्षाची नुकसान भरपाई या वर्षीच्या पर्यटन व्यवसायामुळे भरून निघेल परंतु पर्यटन व्यवसायिकांवर जणू संकटाचे ढग कोसळले आहेत.
वास्तविक, जे लोक पर्यटन व्यवसायावर अवलंबून असतात त्यांना अधिक नुकसान झाले आहे. सरकारने हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायिकांना करात सूट आणि वीजबीलात सूट देण्याचा विचार केला पाहिजे. कारण, जर व्यवसायच ठप्प झाला असेल तर, व्यवसायिक वीजबील कसे फेडणार. त्यामुळे सरकारने हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायिकांची आर्थिकरित्या मदत केली पाहिजे.
नैनीतालचे खासदार अजय भट्ट यांनी सांगितले की, पर्यटन व्यवसायाशी संबंधित लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकार विचार करू शकते, परंतु सरकारकडे देखील स्वतःची आर्थिक संसाधने आहेत, जी व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यामुळे सरकारचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु जेव्हा कोव्हिड-१९ ची गती कमी होईल तेव्हा पर्यटन व्यवसाय पुन्हा पुढे जाताना दिसून येईल.
Uttarakhand: Tourism business derailed due to Corona, businessmen sought financial help from the government.
गोव्यातील ‘ही’ ठिकाणे सर्वात सुरक्षित! –
कोरोना काळात कॅम्पिंगचा आनंद घेण्यासाठी गोव्यातील ‘ही’ ठिकाणे सर्वात सुरक्षित!
कैलास मानसरोवर यात्रा आणि भारत-चीन व्यापार देखील ठप्प! –
पर्यटक न आल्याने उच्च हिमालय पडले ओसाड, कैलास मानसरोवर यात्रा आणि भारत-चीन व्यापार देखील ठप्प!