Beauty Tips : सौंदर्याच्या दिनचर्येत ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करून त्वचेची चमक कायम ठेवा!

 त्वचेशी संबंधित दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नये कारण तुमच्या या निष्काळजीपणामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतात. हे परिणाम मुरुमे, सुरकुत्या, ब्लॅकहेड्स (Blackheads)  आणि व्हाइटहेड्स(Whiteheads) च्या स्वरूपात दिसतात आणि दीर्घकाळापर्यंत राहतात. नियमित त्वचेची निगा राखणे खूप महत्वाचे आहे. त्वचेवरील छिद्रे बंद होण्यापासून रोखण्यासाठी आणि क्लॉनिंगची समस्या दूर करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सर्वातआधी चेहरा स्वच्छ धुवावा, कारण या क्लॉनिंगमुळे मुरूमे तसेच ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या उद्भवते.

 

त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठी कायम एसपीएफ५० आणि त्याहून अधिकचे सनस्क्रीन वापरावे. आणि याचा संबंध या गोष्टीशी अजिबात नाही की तुम्ही बाहेर पडत आहात किंवा नाही. सूर्याची अतिनिल किरणे खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाद्वारे देखील त्वचेत प्रवेश करू शकतात. ती किरणे त्वचेतील कोलेजनवर परिणाम करतात आणि परिणामी त्वचेची लवचिकता आणि आर्द्रता कमी होण्यास सुरूवात होते. तर जाणून घेऊयात सौंदर्य घटक आणि उत्पादने जी आपल्या त्वचेला चांगले ठेवण्यास मदत करतात.

१. चिकणमाती (Clay)-

क्ले त्याच्या डिटॉक्सिफाईंग गुणधर्मामुळे ओळखला जातो. ‘क्ले’युक्त क्लीन्झर्स किंवा फेसमास्क छिद्रांना खुले कऱण्यास मदत करतात आणि त्वचेतील सर्व प्रदूषक घटक बाहेर काढतात.

Beauty-Tips

२. कोळसा (charcoal)-

कोळशाच्या फायद्यांविषयी आपल्याला माहिती असेलच. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कोळशाचा वापर खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होईल कारण हे सेबमला मुळापासून काढून टाकते आणि त्वचेला खोलवर स्वच्छ करते.

Beauty-Tips

३. हळद (turmeric)-

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये हळद हा एक महत्त्वाचा मसाला आहे. हळदीच्या वापराने केवळ रंगत वाढत नाही तर, मुरूमे आणि डागही दूर होतात. हळद त्वचेला डिटॉक्सिफाई करण्याचे देखील कार्य करते.

Beauty-Tips

४. टी ट्री ऑईल (Tea Tree Oil)-

चहाच्या झाडाचे तेल खाज आणि जळजळ कमी करून कोरड्या त्वचेपासून मुक्त करते. याव्यतिरिक्त टी ट्री ऑईलचा वापर केसांसाठी देखील केला जातो ज्यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.

Beauty-Tips
Maintain the beauty and glow of the skin by simply including these 4 things in the beauty routine…..


Beauty Tips : चेहऱ्यावरची चमक कायम ठेवण्यासाठी ‘असा’ बनवा साबुदाणा फेसपॅक! –

Beauty Tips : चेहऱ्यावरची चमक कायम ठेवण्यासाठी ‘असा’ बनवा साबुदाणा फेसपॅक!

Beauty Tips : आरोग्य आणि सौंदर्यासाठी पुदीन्याचे तेल फायदेशीर! –

Beauty Tips : जाणून घ्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी पुदीन्याच्या तेलाचे फायदे……

Social Media