मुंबई : स्थानिक भूमिपुत्रांची समाज भूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळा साठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोक नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे, अश्या शब्दात वंचित बहुजन पक्षाचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी भुमिका स्पष्ट केली आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा दिला
Fought for the fair rights of the project victims
याबाबत एका चित्रफितीव्दारे भुमिका मांडताना प्रकाश आबेंडकर म्हणाले की, नवी मुंबई मध्ये अंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळा साठी रायगड जिल्ह्यातील उलवे कोपर पनवेल या पट्टय़ातील मूळ रहिवासी व भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी जमिन दिली आहे. या बांधवांनी इथलेच भूमिपुत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे. नवी मुंबईच्या इतिहासात दि.बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबई साठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते.
विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद
He was the leader of the opposition in the Assembly
त्यांनी संगितले की, महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखिल दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेल चे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दि. बा. नि लोकसभेत त्यांनी चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाज भूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोक नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी : तीन लाखांपर्यतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज –
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज