देश-विदेशातील पर्यटकांना लवकरच मनाली-लेह मार्गावर आनंददायी प्रवासाची मजा घेता येणार….

मनाली, Manali Leh Highway, देश-विदेशातील पर्यटकांना लवकरच मनाली-लेह मार्गावर आनंददायी प्रवासाची मजा घेता येणार आहे. कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती सामान्य होत आहे. तर, सीमा रस्ते संघटना (बीआरओ) प्रवास सुलभ करण्याच्या कामात व्यस्त आहे. सर्व दर्रो(नैसर्गिक मार्ग) पूर्ववत झाल्यानंतर बीआरओ रस्ते सुधारण्याच्या कामात व्यस्त आहे.

आनंददायी पर्यटनाची मजा घेण्यासाठी मनाली-लेह मार्ग लवकरच खुले…..

Manali-Leh route to enjoy enjoying pleasant tourism soon open.

अटल बोगद्याच्या निर्मितीमुळे ४६ किलोमीटर प्रवास कमी झाला आहे सोबतच चार तासांचा कालावधी देखील वाचतो. मनाली-लेह मार्ग आता केवळ ४३० किलोमीटर लांब राहिला असून या मार्गावर बीआरओने दारचा, जिंजिंगबार, पाटसेऊ, बरलाचा, भरतपूर शहर, केंग सराय, दारचा आणि पांग मधील रस्ते सुधारण्यास सुरुवात केली आहे. बीआरओ च्या मते, ४३० किलोमीटर लांबीचा प्रवास सुलभ बनविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्यांची स्थिती बरी नसल्याने यावेळी ट्रक चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दोन महिन्यांच्या आत १२हून अधिक ट्रक दुर्घटना झाल्या आहेत, तर एका वाहन चालकाला त्याचा जीव गमवावा लागला आहे.

बीआरओ कमांडर कर्नल उमा शंकर यांनी सांगितले की, मनाली-लेह मार्गाची परिस्थिती सुधारली जात आहे. लवकरच पर्यटक आणि वाहन चालक या मार्गावर आंनददायी प्रवासाची मजा घेऊ शकतील. बरलाचा मार्गासह शिंकुला, कुंजम आणि रोहतांग मार्गावर देखील बर्फ पडल्याने रस्ता खराब झाला असून, त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे.
Tourists will soon enjoy a pleasant journey on Manali-Leh road, BRO jawans engaged in campaign.


जम्मू काश्मीर पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार…. –

पर्यटकांची भीती दूर करण्यासाठी काश्मीरमध्ये लसीकरण मोहीम सुरू!

Social Media