मुंबई, Uric Acid Control : शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. सांधेदुखी, पायांची बोटे, गुडघेदुखी, संधिवात इत्यादी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत घरगुती उपचार करा.
मूत्रपिंडाची (किडनी) फिल्टरिंग क्षमता कमी झाल्यास यूरिक ऍसिडचे प्रमाण शरीरात वाढू लागते. जे हाडांच्या मध्यभागी जमा झाल्यास उठणे-बसणे आणि चालणे इत्यादींमध्ये समस्या निर्माण करते. पायांना वेदना आणि सांधेदूखी जाणवते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही घरगुती उपचार केले जाऊ शकतात.
संत्राचे सेवन करा (Consume oranges)-
यूरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी संत्रा खूप फायदेशीर आहे. संत्रामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे यूरिक ऍसिडचे समतोल राखण्यास खूप उपयुक्त आहे.
गाजराचे सेवन करा(Consume carrots)-
गाजर आणि काकडी शरीरासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी असते. याचे सेवन केल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. अशा परिस्थितीत यूरिक ऍसिड देखील नियंत्रित होते.
पुरेशा प्रमाणात पाणी प्या ( Drink enough water)-
पाणी आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. म्हणजेच शरीरातून विषारी पदार्थ घामाच्या स्वरूपात बाहेर काढण्याचे कार्य करते. जर तुम्ही नियमित भरपूर पाणी प्यायले तर, निश्चितपणे यूरिक ऍसिड देखील नियंत्रित राहिल.
सफरचंदाचे सेवन- सफरचंदाचे सेवन केल्याने यूरिक ऍसिड नियंत्रित राहते. कारण यामध्ये सर्व पोषक घटक असतात. जे शरीरात पोहोचून यूरिक ऍसिडचा प्रभाव दूर करण्याचे कार्य करतात. त्यामुळे कमीत-कमी दररोज १ सफरचंदाचे सेवन केले पाहिजे.
Eat cucumber, carrot and orange daily to control uric acid.
दुधाच्या मलईचे इतर आरोग्य फायदे –
अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली दूधाची मलई त्वचा आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम!