अभिनेत्री एरिका फर्नांडिस बनली ‘मोस्ट डिझायरेबल वुमन टीव्ही २०२०’!

नवी दिल्ली : टेलिव्हिजन ‘इंडस्ट्रीची मोस्ट डिझायरेबल वुमन २०२०’ ची (Times 20 Most Desirable Women 2020) यादी टीव्ही कलाकारांसाठी समोर आली आहे. या यादीत छोट्या पडद्यावरील प्रेरणा म्हणजेच अभिनेत्री एरिका फर्नांडिस (erica fernandes) अव्वल स्थानी आहे. एरिका या यादीत प्रथम आल्याने खूप आनंदी आहे.

मागील वर्षी आलेल्या यादीत एरिकाचे नाव चौथ्या स्थानावर होते. परंतु यावर्षी आलेल्या यादीवर एरिकाला विश्वासच बसत नाही. आपले नाव प्रथम आल्याने एरिकाने आनंद व्यक्त केला आहे. माध्यमांना मुलाखत देताना एरिकाने सांगितले की, ‘असे वाटते की आयुष्य खरच गोलाकार आहे. मी माझ्या करियरची सुरूवात सन २०१० मध्ये टाइम्स फ्रेश फेस ही स्पर्धा जिंकून केली होती, दोन वर्षानंतर मी मिस इंडिया पेजंट ची फायनलिस्ट होते, आणि आता मी मोस्ट डिझायरेबल वुमन टीव्ही २०२० च्या यादीत प्रथम आले आहे. तिने पुढे सांगितले की, खरे सांगायचे झाले तर अजूनही माझा विश्वासच बसत नाही. परंतु मी त्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी आतापर्यंत या वाटचालीत मला पाठिंबा दिला आहे. ’

या यादीत एरिका व्यतिरिक्त टेलिव्हिजनच्या अनेक अभिनेत्रींची नावे समाविष्ट आहेत. या यादीत अभिनेत्रींची नावे टीव्हीवरील लोकप्रियता, इंटरनल ज्यूरी तसेच ऑनलाईन देण्यात आलेल्या मतांच्या आधारे देण्यात आली आहेत. आणि याची क्रमवारी देखील याच आधारे देण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर निया शर्मा, त्यानंतर जास्मीन भसीन, सुरभी चांदना, जेनिफर विंगेट, करिश्मा तन्ना, सुरभि ज्योति, निक्की तंबोली, शिवांगी जोशी, रुबीना दिलैक, शहनाज गिल, निमृत कौर आहलुवालिया, अवनीत कौर, श्रद्धा आर्या, पवित्र पुनिया, अविका गौर, हिमांशी खुराना, आरुषी चावला, दिव्या अग्रवाल, प्रियंवदा कांत, अशी क्रमवारी आहे.
एरिका फर्नांडिसच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, ती सध्या टीव्ही शो ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी ३’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. याशिवाय तिने ‘कसोटी जिंदगी की 2’ मध्ये प्रेरणाची भूमिका साकारली आहे.
Erica Fernandes became TV’s Most Desirable Woman 2020, said- ‘I still can’t believe it’


महाभारतावर आधारित चित्रपटात रिया चक्रवर्ती द्रौपदीच्या भूमिकेत? –

महाभारतावर आधारित असलेल्या चित्रपटात रिया चक्रवर्ती द्रौपदीची भूमिका साकारण्याची शक्यता!

Social Media