Beauty tips : गर्भधारणेदरम्यान अशी घ्या सौंदर्याची काळजी….

Beauty tips for Pregnancy: कोणत्याही स्त्रीसाठी आई होण्याच्या आनंदापेक्षा काहीही मौल्यवान नाही. गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक बदल होतात ज्याचा परिणाम त्वचेवर देखील पहायला मिळतो. गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्सच्या प्रमाणात चढ-उतार येत असतो आणि त्वचा हे बदल दर्शविते. यामुळे तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आपले सौंदर्य कायम ठेवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता जे तुमच्या त्वचेला कोमल, चमकदार आणि तेजस्वी बनवेल.

जाणून घ्या गर्भधारणेदरम्यान कोणते उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील (How to take care of beauty during pregnancy)-

  •  योग्य प्रमाणात पाणी प्या (drink proper amount of water)- डॉक्टरांचे म्हणणे आहे की, एका गर्भवती महिलेसाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप आवश्यक असते. त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य आणि चमक कायम ठेवण्यासाठी आपल्या शरीराला कायम हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे.

 Beauty-tips-for-Pregnancy

  • व्यायामाला कधीही नाही म्हणू नका (never say no to workouts)- गर्भधारणेदरम्यान, मेटरनिटी योगा आणि मेडिटेशन करत रहा. लक्षात ठेवा तुम्हाला योगा आणि व्यायाम प्रशिक्षकाच्या समोर करायचा आहे. योगा, व्यायाम आणि मेडिटेशनमुळे (ध्यान) तुमचा तणाव (स्ट्रेस) दूर होईल आणि त्वचेला ताजे वाटेल.

 Beauty-tips-for-Pregnancy

  •  मुरुमांपासून मुक्ती (This is how you will get rid of acne)- जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूमे असतील तर, दिवसातून दोनवेळा तुमच्या त्वचेला क्लींझरने स्वच्छ करा परंतु चेहऱ्यासाठी रफ टॉवेलचा वापर करू नका. या दरम्यान स्र्कबचा वापर टाळावा आणि तेलकट नसलेल्या मॉइश्चरायझरचा आणि मेकअपचा वापर करावा.

Beauty-tips-Feet

  •  हात-पायांची अशी घ्या काळजी (Take care of hands and feet like this)- मॅनिक्युअर आणि पेडीक्योर हात आणि पायांसाठी चांगले आहे. हार्मोन्सच्या बदलामुळे पायांची त्वचा फाटलेली वाटू शकते आणि हात कोरडे पडू शकतात, त्यामुळे मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करू शकता.

Beauty-tips

  • अशी करा स्ट्रेच मार्क्सची समस्या दूर (How to remove stretch marks)- गरोदरपणात, स्ट्रेचमार्क्स येणे हे खूप सामान्य आहे. यासाठी त्वचेला नेहमी मॉइश्चराइज ठेवा आणि डॉक्टाच्या सल्ल्याने तुम्ही लोशन, मॉइश्चराइजर आणि क्रिमचा वापर करू शकता.

Beauty tips for Pregnancy: Take care of beauty in those nine months, see pregnancy beauty tips.


Beauty Tips : जाणून घ्या कारल्याचा वापर त्वचेसाठी कसा करावा…..

Beauty Tips : कारले आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर!

Social Media