मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने ( Kangana Ranaut) पासपोर्ट नुतनीकरणासाठी (passport renewal) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने न्यायालयात अर्ज करताना म्हटले आहे की, वांद्रे पोलिसांद्वारे, तिच्या विरूद्ध द्वेषयुक्त ट्विट आणि देशद्रोहासाठी एफआयआर नोंदविल्यामुळे पासपोर्ट प्राधिकरण याबाबत आक्षेप घेत आहे. या प्रकरणात तिची बहिण रंगोली चंदेल ही देखील आरोपी आहे.
कंगनाने तिच्या अर्जात लिहिले आहे की, ती एक अभिनेत्री असल्याने तिला व्यावसायिक कामासाठी देशाव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो. कंगनाने अशी माहिती दिली आहे की तिला एका चित्रपटाचे चित्रिकरण करायचे आहे ज्यामध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. त्यासाठी तिला १५ जून ते ऑगस्ट २०२१ पर्यंत बुडापेस्ट येथे जावे लागणार आहे.
कंगना रणावतच्या अडचणीत वाढ, पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास नकार मिळाल्याने
मुंबई उच्च न्यायालयात धाव….
Kangana Ranaut’s problem increases, passport refused to be renewed
Run in the Bombay High Court…
कंगणाने अर्जात पुढे म्हटले आहे की, तिच्या पासपोर्टचा कालावधी सप्टेंबर २०२१ मध्ये संपला असून तिला तिच्या पासपोर्टचे नुतणीकरण करायचे आहे. परंतु तिच्या विरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याच्या प्रकरणामुळे तिच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, अजूनही उच्च न्यायालयाद्वारे यावार कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही की, कंगनाच्या पासपोर्टचे नुतनीकरण केले जावे किंवा नाही. कंगना रणावत कायमच तिच्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने अलिकडेच बंगाल निवडणुकीनंतर झालेल्या दंगलींवर अनेक ट्विट केले होते. याव्यतिरिक्त तिने ममता बॅनर्जी यांच्यासाठी देखील आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. त्यानंतर ट्विटरने तिच्या विरूद्ध कारवाई केली होती आणि तिचा ट्विटर अकाउंट बॅन केला.
Kangana Ranaut’s difficulties increased, refused to renew passport, actress reached Bombay High Court.
’बेलबॉटम’ चित्रपटासाठी ३० कोटी कमी केल्याच्या अफवांवर अक्षय कुमारने दिली ट्विटद्वारे प्रतिक्रिया…. –
’बेलबॉटम’ चित्रपटासाठी ३० कोटी कमी करण्याच्या अफवांवर अक्षय कुमारचा खुलासा!