‘द कपिल शर्मा’ शोचा लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक!

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा’(The Kapil Sharma Show) लवकरच कमबॅक करणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे दुसऱ्यांदा लागलेल्या लॉकडाऊनमुळे कपिल शर्माचा कार्यक्रम काही काळासाठी बंद करण्यात आला होता त्यामुळे चाहते खूप नाराज झाले होते. चाहते ‘द कपिल शर्मा’ शो परत येण्याची आतुरतेने वाट बघत होते. दरम्यान कॉमेडियन कृष्णा अभिषेकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर (इंस्टाग्राम) एक असा फोटो सामाईक केला आहे ज्याद्वारे असा अंदाज लावला जात आहे की कपिल शर्मा त्याच्या टीमसोबत लवकरच परत येणार आहे.

कृष्णाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो सामाईक केला आहे ज्यात तो, भारती सिंग आणि कीकू शारदा दिसत आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, ‘लवकरच परत येत आहोत. आमची पहिली क्रिएटिव्ह मिटींग.. खूप उत्साही होती. नवीन माल लवकरच येत आहे.’

’बेलबॉटम’ चित्रपटासाठी ३० कोटी कमी केल्याच्या अफवांवर अक्षय कुमारने दिली ट्विटद्वारे प्रतिक्रिया….

यावेळी ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये काही बदल बघायला मिळतील. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम २१ जुलैपासून सुरू होईल. कपिलसह भारती सिंग, कीकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि कृष्णा अभिषेक देखील पूर्वीप्रमाणे या कार्यक्रमाचा भाग असेल. तथापि, यावेळी सेटवर लाईव्ह प्रेक्षक असतील की नाही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तर यावेळी नवीन लोकांना देखील या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी कपिलने पोस्ट शेअर केली होती ज्यात त्याने म्हटले होते की, मेकर्स नवीन लेखक आणि कलाकारांच्या शोधात आहेत.
‘The Kapil Sharma Show’ ready for comeback, Krushna Abhishek shared this photo.


कंगना रणावतच्या अडचणीत वाढ, पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास नकार मिळाल्यानेमुंबई उच्च न्यायालयात धाव….

पासपोर्टच्या नूतनीकरणास नकार दिल्याने कंगना रणावतची मुंबई उच्च न्यायालयात धाव….

Social Media