Beauty Tips : निरोगी त्वचा आणि केसांसाठी वापरा ‘बीट’चा मास्क…

Beauty Tips : निरोगी त्वचा आणि केसांसाठी घरी बनविलेल्या बीटाच्या मास्कचा वापर केला जाऊ शकतो. बीटामध्ये व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन ए, आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक असतात. हे केवळ शरीरातील रक्ताच्या उत्पादनात सुधारणा करत नाही तर, त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर असल्याचे मानले जाते. केस आणि त्वचेसाठी बीटाचा मास्क कसा तयार केला जातो ते जाणून घेऊयात…..

बीट मास्क (how to make beetroot mask)-

बीटाचा मास्क बनविण्यासाठी किसलेल्या बीटाचा ताजा रस, दही, बेसन आणि लिंबाच्या रसाची आवश्यकता आहे. चेहऱ्यासाठी बेसन बायंडिंग एजंट म्हणून कार्य करते. लिंबाचे रस त्वचा आणि केसांना स्वच्छ करते तसेच दही त्वचेला मॉइश्चराइझ करते.

Beauty-Tips

हा मास्क चेहऱ्यावर अशा प्रकारे वापरला जाऊ शकतो (This mask can be used on the face like this)-

प्रथम चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा आणि कोरडा झाल्यानंतर ब्रश किंवा हाताच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर हा फेसमास्क लावा. सर्कुलर मोशनमध्ये चेहऱ्यावर मास्कने मसाज करत तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर २० ते २५ मिनिटे तसेच ठेवून कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Beauty-Tips

 केसांसाठी मास्कचा वापर कसा कराल (how to use hair mask)-

सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या केसांवर थोडेसे पाणी शिंपडा जेणेकरून मास्क योग्य प्रकारे लावता येईल. त्यानंतर केसांचे लहान-लहान भाग करून मास्क केसांच्या मूळापासून शेवटपर्यंत लावा. हे अशा प्रकारे लावा की तुमचे संपूर्ण केस या मास्कने झाकले जातील. त्यानंतर पाण्याने केसांना स्वच्छ करा. केसांना मऊ करण्यासाठी सौम्य शाम्पू आणि कंडीशनरचा वापर करा.

Beauty-Tips

त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे (Benefits of beetroot mask for skin and hair)-
  1.  बीटाच्या मास्कमुळे तुम्हाला चमकदार आणि निरोगी त्वचा प्राप्त होते, कारण यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे हानी पोहोचविणाऱ्या मुक्त पेशींशी लढते.
  2. बीटाचा मास्क काळी वर्तुळे आणि पिंगमेंटेशनची समस्या दूर करण्यास मदत करतो.
  3.  बीटामध्ये आयर्न आणि कॅरोटेनॉइड्स असल्याने चेहऱ्याचे रक्त परिसंचरण चांगले होते. यामुळे चेहऱ्यावर एक चमक येते. तसेच काळे डाग आणि सूज कमी करण्यास देखील मदत करते.
    Homemade beetroot masks can be used for healthy skin and hair. Beetroot contains nutrients like Vitamin B6, Vitamin A and Vitamin D.

Beauty Tips : घरगुती उपाय करून ओठांवर पडलेले काळे डाग करा दूर!  –

Beauty Tips :ओठांवर पडलेले लिपस्टिकचे डाग दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

Social Media