बदामाचे दूध आरोग्यासंबंधित समस्यांपासून दूर ठेवण्यास फायदेशीर!

मुंबई, Almond Milk Benefits: मानवाचे शरीर इतके नाजूक असते की जराही दुर्लक्ष झाले तर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. यामागे बरीच कारणे असतात. शरीरात प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊयात शरीराला मजबूत ठेवण्यासाठीचे उपाय…

बदामापासून बनविलेले दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आरोग्य तज्ञांच्या मते, बदामाचे दूध पिण्यामुळे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वेगाने वाढते. बदामातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ‘ई’सह प्रोटीन शरीरासाठी खूप चांगले असल्याचे मानले जाते. तज्ञांचे म्हणणे आहे की, हे सर्व पोषक तत्व शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.

Almond-Milk

हृदय, हाडांवर विशेष प्रभाव (Heart, bones will have a special effect)-बदामाचे दूध प्यायल्याने तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता पूर्ण होते. रोग प्रतिकारकशक्ती मजबूत ठेवण्यासाठी हे खूप मदत करते. एक कप बदामाच्या दूधाचे जर तुम्ही रोज सेवन केलेत तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होणार नाही. यामुळे तुमचे हृदय आणि हाडे, अधिक चांगले कार्य करतील.

बदामाचे-दूध

आरोग्य तज्ञांच्या मते, जर एखादा व्यक्ती मधूमेहाने ग्रस्त असेल तर त्याने सामान्य दूधाऐवजी बदामाच्या दूधाचे सेवन केले पाहिजे. बदामाच्या दूधात साखरेचे प्रमाण कमी असते आणि फायबरयुक्त असल्याने शरीरासाठी देखील फायदेशीर सिद्ध होते.
Almond milk will keep you away from health problems, know its amazing benefits.


दुधाच्या मलईचे इतर आरोग्य फायदे –

अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली दूधाची मलई त्वचा आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम!

Social Media