चेहऱ्याला अधिक चांगले बनविण्यासाठी अनेकवेळा आपण महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतो परंतु आपल्या त्वचेत त्यामुळे देखील विशेष परिणाम दिसून येत नाही. तर अनेक वेळा चेहऱ्यावर विपरित परिणाम झाल्याचे दिसून येते. याचा अर्थ असा नाही की उत्पादने खराब आहेत परंतु असे म्हटले जाऊ शकते की तुम्हाला तुमच्या त्वचेवर कोणती उत्पादने वापरली जावीत याची अजिबात माहिती नाही. पाहूयात त्वचेच्या कोणत्या प्रकारासाठी काय फायदेशीर आहे….
तेलकट त्वचेसाठी (It will be beneficial for oily skin)-
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर, तुम्ही सायट्रिक ऍसिड असणाऱ्या वस्तूंचा वापर करू शकता. उदारणार्थ स्ट्रॉबेरी, किवी, टोमॅटो, लिंबू इत्यादी. तर, तेलकट त्वचेसाठी टी ट्री ऑईल, ऑर्गन ऑईल खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते.
Beauty Tips : घरगुती उपाय करून ओठांवर पडलेले काळे डाग करा दूर! –
कोरडी त्वचा (dry skin)-
कोरड्या त्वचेसाठी बदामाचे तेल(Almond oil), ऑलिव्ह ऑईल (olive oil)तसेच नारळाचे तेल खूप उपयुक्त असल्याचे मानले जाते. नियमित रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर यापैकी कोणत्याही तेलाचा वापर केलात तर, लवकरच तुम्हाला तुमच्या त्वचेच्या रंगात विशेष बदल झाल्याचे दिसून येईल आणि त्वचा चमकू लागेल.
संयोजन त्वचा (Use this on combination skin)-
ज्या लोकांची त्वचा अधिक तेलकट नाही किंवा अधिक कोरडी देखील नाही त्यांनी मध, दही आणि कोरफड (ऍलोव्हेरा) यासारख्या गोष्टींचा वापर करावा. उत्पादनांविषयी बोलायचे झाले तर एक्सफोलिएटिंग आणि हायड्रेटिंग ऍसिडच्या वापराने लवकरच चांगले परिणाम पहायला मिळतील.
Skin Care: Choose beauty products according to skin tone, results will be miraculous.
beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे –
Beauty Tips : निरोगी त्वचा आणि केसांसाठी वापरा ‘बीट’चा मास्क…