मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (swara bhaskar) विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपात पोलिसांनी एफआयआर(FIR) नोंदविला आहे. स्वरा भास्करवर असा आरोप आहे की, तिने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक अशी पोस्ट टाकली आहे, जी पुढे जाऊन बनावट असल्याचे सिद्ध झाले. या पोस्टमुळे स्वराविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात होती. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, सोशल मीडियावर स्वराचे लाखो फॉलोअर्स आहेत, अशा परिस्थितीत कलाकाराने जबाबदार असले पाहिजे. परंतु स्वराने तिच्या ट्विटर हॅँडलद्वारे नागरिकांमध्ये व्देष पसरविण्याचे काम केले आहे.
वास्तविक, स्वरा भास्करने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये असे दिसून येत होते की एका वृध्द व्यक्तीला वंदे मातरम बोलण्यासाठी सक्ती केली जात आहे आणि या कारणास्तव लोकांनी त्याची दाढी कापली आणि मारहाण केली. या व्हिडीओ मध्ये धर्मा संदर्भात घोषणा दिल्याचेही म्हटले आहे. त्यानंतर, या गोष्टी खोट्या असल्याचे सिद्ध झाले आणि माध्यमांतून असे समोर आले की, ताबीज संदर्भात हा वाद झाला होता आणि वृद्धाला मारहाण करणारे लोक देखील एकाच समाजातील होते. त्यानंतर स्वरा भास्करला सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल करण्यात आले.
यानंतर देखील स्वरा थांबली नाही आणि तिने आणखी एक ट्विट केले, ‘आर डब्ल्यू आणि संघी सतत माझ्या टाइमलाइनवर उल्टी करत आहेत. कारण गाझियाबाद पोलिसांनी एकाच समाजातील तिघांची नावे घेतली आहेत. मुख्य आरोपी परवेश गुज्जर आहे. जो व्यक्ती कॅमेरात दिसून येत आहे, तो वृद्ध व्यक्तीवर सक्ती करीत आहे. माझ्या देवाने ही खूप चुकीची निर्मिती केली आहे. मला लाज वाटते आणि तुम्हालाही वाटली पाहिजे.’
तक्रारीनुसार, वापरकर्त्यांनी सांगितले की, ‘मुद्दाम खोटी माहिती सामायिक केली आणि अशाप्रकारे आयपीसी कलम १५३,१५३ए, २९५ए, ५०५, १२०बी आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, स्पष्ट माहिती उपलब्ध असूनही वरील वापरकर्त्यांनी या घटनेचा वापर जातीयवाद आणि धर्मांमध्ये द्वेष पसरविण्यासाठी केला आहे. ’
FIR registered against Swara Bhaskar for social media post, accused of inciting religious sentiments.
कृष्णा अभिषेकने फोटो शेअर करत ‘द कपिल शर्मा’ शो परत येणाचा दिला इशारा… –