लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या (corona virus) डेल्टा व्हेरिएंटने हाहाकार माजवला आहे. एका अभ्यासानुसार, ब्रिटनमध्ये मे पासून कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये ५० टक्के वाढ होण्याला डेल्टा व्हेरिएंट जबाबदार आहे. गुरूवारी इम्पीरियल कॉलेज लंडनच्या नेतृत्वात केलेल्या एका मोठ्या प्रसार अभ्यासात असे आढळून आले की, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या अधिक प्रसारामुळे मे पासून इंग्लंड मध्ये संसर्गात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ब्रिटनविरूद्ध लेबर पार्टीने मंगळवारी विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंच्या प्रकरणात वाढ होण्याला पंतप्रधान बोरिस जॉनसनद्वारा भारतीय प्रवाशांवरील बंदीचा निर्णय उशीरा लागू करण्याला ठरविले होते. विषाणूचा हा प्रकार सर्वात प्रथम भारतात आढळला होता आणि प्रकरणात वाढ झाल्याने ब्रिटनमध्ये लॉकडाऊनला आणखी चार आठवड्यांसाठी १९ जुलैपर्यंत वाढवावा लागला आहे.
कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सहा लाखांच्या पुढे
Corona infection deaths cross six lakh
अमेरिकेत लसीकरणाचे कार्य वेगाने सुरू असताना कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सहा लाखांच्या पुढे गेली आहे. येथे कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट संदर्भात तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. राष्ट्रपती जो बायडन यांनी इशारा दिला आहे की, कोरोनाशी लढा अद्याप संपलेला नाही. जनतेने लवकरात-लवकर लस घ्यावी. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज एँड प्रिव्हेंशन सेंटरने (सीडीसी) कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. हा व्हेरिएंट अधिक घातक आणि संसर्गजन्य आहे. सीडीसीनुसार, हा अल्फा व्हेरिएंटपेक्षा ५० टक्के अधिक वेगाने पसरतो. या व्हेरिएंटमुळे रूग्णालयामध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या सुमारे अडीच पट जास्त झाली आहे.
Corona’s delta variant stirred up in Britain, claimed to be responsible for 50% increase in infection cases.
बदामापासून बनविलेले दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर –
बदामाचे दूध आरोग्यासंबंधित समस्यांपासून दूर ठेवण्यास फायदेशीर!