ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, फिटनेस सर्टिफिकेटची मुदत पुन्हा वाढवली

नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, फिटनेस सर्टिफिकेट यांची पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. ३० जूनपर्यंत वैध असलेले वाहन परवाने (ड्रायव्हिंग लायसन्स), सक्षमता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट), वाहनांचा देशभरातील प्रवासाचा परवाना (परमिट) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची (आरसी) मुदत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपल्या वाहन परवाना, सक्षमता प्रमाणपत्र तसेच वाहनांशी संबंधित अन्य आवश्यक प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करून घेता आले नाही. या लोकांच्या सोयीसाठी ३० जूनला संपत असलेल्या त्यांच्या वाहनांशी संबंधित सर्व प्रकारच्या परवान्यांची आणि कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे.

वाझे सोबत शर्मा यांचा गुन्ह्यात सहभाग – 

सरकारच्या या निर्णयामुळे मुदत संपत आलेले सर्व प्रकारचे शिकाऊ वाहन परवाने, स्थायी वाहन परवाने, सक्षमता प्रमाणपत्र, वाहनांचा देशभरातील प्रवासाचा परवाना आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आता ३० सप्टेंबरपर्यंत वैध ठरले आहेत. मोटर व्हेईकल ऍक्ट 1988 तसेच सेंट्रल मोटर व्हेईकल नियम 1989 नुसार वाहनांच्या वैध कागदपत्रांची मुदत वाढवण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.

Driving licences, permits, fitness certificates have once again been extended. The Union Ministry of Surface Transport and Highways has extended the deadline for vehicle licences (driving licences), fitness certificates, vehicle permits and registration certificates (RC) valid till September 30.


दोन्ही राज्यातील संवाद चांगला वाढावा यासाठी जयंत पाटील शनिवारी कर्नाटकच्या दौर्‍यावर… –

शनिवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार : जयंत पाटील

Social Media