मुंबई : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या वाढदिवशी १९ जुनला मुंबईच्या टिळक भवनात माजी मंत्री डॉ सुनिल देशमुख यांचा कॉग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अविनाश पांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी नुतनीकरण केलेल्या कॉंग्रेस भवनचे उदघाटन होणार आहे. सुनील देशमुख यांच्यासोबतच माजी मंत्री संजय देशमुख व अन्य काँग्रेसचे माजी नेते घरवापसी करणार आहेत.
अनेकांची घरवापसी होणार असल्याची माहिती
Many are reported to be returning home
नाना पटोले यांनी नुकताच केलेला विदर्भ दौरा आणि स्वतःचे स्थान बळकट करण्याच्या दिशेने चालविलेले प्रयत्न, त्या दृष्टीने अनेकांची घरवापसी होणार असल्याची माहिती कॉंग्रेस मधील सूत्रांनी दिली. त्यांनी सांगितले की, डॉ सुनील देशमुख यांची काँगेसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. किंवा त्यांना मध्यप्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी सोपविणार असल्याचेही सांगितले जात आहे.
भाजपातून घरवापसी( Homecoming from BJP)
सुनील देशमुख २००४ मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. त्याशिवाय, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देखील सोपवली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुलभा संजय खोडके यांनी सुनील देशमुख यांचा पराभव केला.
भाजपला राजकीय धक्के(Bjp’s political shocks)
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपला धक्के बसत आहेत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव, सांगली व जळगाव महापालिकेची सत्ता हातातून निसटल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. पुन्हा सत्ता मिळण्याची चिन्हे नसल्याने निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आलेले अनेक नेते व आमदार अस्वस्थ आहेत. त्यातूनच आता घरवापसी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत राज्याचा दौरा सुरू केला आहे. काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षापासून दुरावलेल्या जुन्या-जाणत्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यावरही त्यांचा भर आहे.
परवान्यांची आणि कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय –
ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, फिटनेस सर्टिफिकेटची मुदत पुन्हा वाढवली