मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढले तर चमत्कार होईल, असे शिवसेनेच्या मुखपत्रात विचार व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या भुमिकेला दुजोरा दिला. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसला जो संदेश जाणे अपेक्षीत होते तो गेल्याचे मानले जात आहे. कारण या संदेशानंतर काँग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat)यांनी यावर प्रतिक्रिया देताना वेळ आल्यावर पक्ष याबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगत, काँग्रेसची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
सामाईक कार्यक्रमावर सरकार(Government on Common Programme)
ते म्हणाले की,राज्यात तीन राजकीय पक्षांचे महाविकास आघाडी सरकार एका सामाईक कार्यक्रमावर चालविण्यात येत आहे. असे असले तरी तिन्ही राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नंतर सरकार पाच वर्षे टिकेल कोणताही धोका नाही, असे सांगितले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात भाजपला दूर ठेवण्यासाठी तीन पक्ष एकत्र आलो आहोत. पुढील निवडणुकांबाबतही वेळ आल्यावर निर्णय होईल असे सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यानी पक्षाची बाजू सावरून घेतली आहे.
कॉंग्रेसजनांची १९ जुनला राहुल गांधीच्या वाढदिवशी घरवापसी! –