नवी दिल्ली : मे महिन्यात कोव्हिड-१९च्या दुसऱ्या लाटेमुळे देशांतर्गत, हवाई यात्रा आणि विमान क्षेत्राला चांगलाच फटका बसला. मे महिन्यात २१.१५ लाख प्रवाश्यांनी देशांतर्गत मार्गावर हवाई प्रवास केला. ही आकडेवारी एप्रिलमध्ये ५७.२५ लाख प्रवाश्यांच्या तुलनेत ६३ टक्क्यांनी कमी आहे. नागरी उड्डयन संचालनालयानुसार, (डीजीसीए) मार्च २०२१ मध्ये ७८.२२ लाख लोकांनी देशांतर्गत हवाई यात्रा केली.
डीजीसीए च्या मते विमान कंपनी इंडिगोमध्ये ११.६९ लाख प्रवाशांनी यात्रा केली जे देशांतर्गत हवाई यात्रा करणाऱ्या एकूण प्रवाशांच्या ५५.३ टक्के आहे. याव्यतिरिक्त एअर इंडिया कंपनीमध्ये ४.२९ लाख, गो फर्स्ट (गो एयर)द्वारे १.३८ लाख, विस्तारामध्ये ९७ हजार आणि एअर आशियाद्वारे ६४ हजार प्रवाशांनी मे महिन्यात प्रवास केला. १.९९ लाख प्रवाशांनी स्पाइसजेटमधून प्रवास केला जे एकूण देशांतर्गत हवाई उड्डाणापैकी ९.४ टक्के आहे.
कोरोनामुळे विमान क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान
सहा मोठ्या विमान सेवा कंपन्यांचा पॅसेंजर लोड फॅक्टर (पीएलएफ) म्हणजेच भरलेल्या जागांचे प्रमाण मे मध्ये घसरणीमुळे ३९.३ वरून ६४ टक्क्यांच्या दरम्यान होता. परवडणारी विमान कंपनी स्पाइसजेटचा पीएलएफ मे मध्ये ६४ टक्के होता. त्यानंतर गोएअर चा पीएलएफ ६३.३ टक्के, इंडिगोचा ५१.२ टक्के, एअर आशियाचा ४४.४ टक्के, स्टार एअर चा ४१.२ टक्के, विस्तारचा पीएलएफ ४०.९ टक्के आणि एअर इंडियाचा ३९.३ टक्के होता.
डीजीसीएनुसार, इंडिगोने बंगळुरू, दिल्ली, हैद्राबाद आणि मुंबई या चार मेट्रो विमानतळांवर ९८.७ टक्क्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ऑन-टाईम कामगिरीच्या बाबतीत विस्तार ९८.१ टक्क्यांसह दुसऱ्या आणि एअर आशिया ९७.४ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर होती. मागील वर्षी दोन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर २५ मे रोजी देशांतर्गत हवाई प्रवासाला ५० टक्के प्रवाशांच्या परवानगीसह सुरू करण्यात आले होते.
Airline sector badly affected by Corona, 21.15 lakh air travel in May, 63 percent decline in comparison to April.
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन लाख कोटी रूपयांचे नुकसान