Beauty Tips : ब्लॅकहेड्सच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी अंड्याचा फेसपॅक फायेदशीर!

Beauty Tips: आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर अनेक छोटे-छोटे हेअर फॉलिकल्स (केसांची रोमछिद्र) असतात. या छिद्रांमध्ये लहान आणि पातळ केस असतात आणि तेलाचे उत्पादन करणाऱ्या ग्रंथी असतात. या तेलाला सीबम (Sebum) म्हटले जाते, जे त्वचेला मऊ बनविण्यास मदत करते. रोमछिद्र मोठी झाल्यास यामध्ये मृतपेशी, धुळ-माती आणि सीबम जमा होतो आणि यामुळे ब्लॅकहेड्स तयार होतात. ब्लॅकहेड्स सोबतच मुरूमांची समस्या देखील उद्भवते परंतु केवळ अंड्याच्या मदतीने तुम्ही ब्लॅकहेड्सच्या समस्येतून मुक्त होऊ शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे ही सौंदर्य टीप (Beauty Hack) एकदम सोपी आणि स्वस्त आहे. तर मग जाणून घेऊयात अंड्याच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स (Blackheads Home Remedies) कशाप्रकारे काढले जाते.

Blackheads-Home-Remedies

beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे

अंड्याच्या मदतीने कसे काढावेत ब्लॅकहेड्स (Blackheads Homeremedies)-अंडा तुमच्या रोमछिद्रात जमा झालेली धुळ-माती, घाण, सीबम आणि मृतपेशींना खेचून बाहेर काढण्यात मदत करतो. यासोबतच रोमछिद्रांना टाइट करण्याचे देखील काम करतो. तुम्ही अंड्याच्या मदतीने एक फेसपॅक तयार करू शकता, जो तुमच्या चेहऱ्याला व्हिटॅमिन ई आणि एँटीमायक्रोबियल (प्रतिजैविक) गुणधर्म प्रदान करेल आणि यामुळे त्वचेवर चमक देखील येईल. अंड्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी अर्धा चमचा मध, ३,४ थेंब लिंबाचा रस, १ छोटा चमचा काकडीचा रस, १ छोटा चमचा मुल्तानी माती आणि २ अंडे घ्या. त्यानंतर, सर्वात प्रथम एका वाटीत २ अंडी चांगल्याप्रकारे फेटा. त्यानंतर लिंबाचा रस, मध आणि मुल्तानी माती मिसळा. ही पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात काकडीचा रस मिसळा, ही पेस्ट ५ ते १० मिनिटे बाजूला ठेवा.

Beauty-Hack

Beauty Tips : घरगुती उपाय करून ओठांवर पडलेले काळे डाग करा दूर! 

अंड्याचा फेसपॅक लावण्याची पद्धत (How to apply Egg Face Mask): ब्लॅकहेड्स काढण्यासाठी अंड्याच्या फेसपॅकचा वापर करण्यापूर्वी (Egg Face Mask for blackheads) चेहऱ्याला कोमट पाण्याने चांगल्याप्रकारे स्वच्छ करा. लक्षात ठेवा चेहरा धुताना साबण किंवा फेसव़ॉशचा वापर करू नका. त्यानंतर मेकअप ब्रशच्या मदतीने पेस्ट चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे लावा. हा फेसपॅक २० मिनिटे तसाच ठेवा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. हा ब्यूटी हॅक तुम्ही आठवड्यातून चारवेळा करू शकता.
Beauty Tips: Egg will get rid of blackheads, learn cheap beauty hacks.


Beauty Tips : जाणून घ्या त्वचेच्या कोणत्या प्रकारासाठी कोणती उत्पादने फायदेशीर….

Beauty Tips : चांगले परिणाम मिळविण्यासाठी निवडा त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने…..

Social Media