बिहारच्या रोहतासमधील इंद्रपुरी धरण बनत आहे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र!

रोहतास : जगातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या इंद्रपुरी धरणाकडे (बॅरेज) पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी बिहार सरकारच्या पर्यटन विभागाने इंटरनेट मीडियाची मदत घेतली आहे. फेसबुकवर याचे पोस्टर जारी करण्यात आले आहे. या बॅरेज च्या माध्यमातून जुन्या शाहाबाद आणि मगध प्रदेशातील आठ जिल्ह्यांना सिंचनासाठी पाणी पुरविले जाते. पर्यटनाच्या दृष्टीने देखील हे धरण खूप महत्वपूर्ण आहे.

रोजगाराच्या  संधी(Employment Opportunities)

याशिवाय लोकांना रोजगाराच्या चांगल्या संधी देखील उपलब्ध करून देता येतील. इंद्रपुरी धरणाजवळ जल संसाधन विभागाने अडीच कोटी रूपयांचा खर्च करून ईको पार्क तयार केले आहे. त्याचे उद्घाटन देखील लवकरच होईल. येथे थंडीच्या दिवसांत सायबेरियन पक्ष्यांसह अनेक स्थलांतरित पक्षी येतात. अशा परिस्थितीत या ठिकाणचे सौंदर्य बघण्यासारखे असते.

सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र मानसरोवर तलाव – 

एनिकट बॅरेज(barrage )

ब्रिटिश काळात इ.स. १८७२ मध्ये येथे एनिकट बॅरेज बांधण्यात आले होते. तथापि, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथून १० किमी अंतरावर सोन नदीवर इंद्रपुरी धरण बांधण्यात आले. ज्याचे उद्घाटन १९६५ मध्ये देशाचे तत्कालीन उपपंतप्रधान गुलजारी लाल नंदा यांनी केले होते. रोहतास आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या लोकांसाठी सहलीचे ठिकाण म्हणून हे स्थळ खूप लोकप्रिय आहे. अलिकडेच अडीच कोटी खर्च करून इको पार्कची निर्मिती करण्यात आली असून लवकरच हे उद्यान लोकांसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे. पर्यटन विभागाच्या या उपक्रमाचे स्थानिक लोकांनी स्वागत केले आहे.
The world’s fourth largest barrage is in Rohtas, Bihar, Indrapuri barrage is becoming a big center of tourism.


जूनच्या उर्वरित दोन आठवड्यांमध्ये मोठ्या संख्यने पर्यटक मसुरीला भेट देण्याची शक्यता….. –

शनिवार, रविवार मसुरीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची अपेक्षा, पर्यटकांची हॉटेल्समध्ये 40 टक्के बुकिंग….

Social Media