कोरोनाची तिसरी लाट आल्यास भारत सामना करण्यास पूर्णपणे सुसज्ज : केंद्र सरकार

हैद्राबाद, Coronavirus Third Wave: भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होण्यासह तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविली जात आहे. याबाबत आतापासूनच सावधानगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. याबाबतच्या शक्यता समोर येताच केंद्र सरकारद्वारे याचे उत्तर आले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले आहे की, जर भारतात कोरोनाची तिसरी लाट आली तर आम्ही पूर्णपणे तयार आहोत.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास भारताची वैद्यकीय पायभूत सुविधा पूर्णपणे सुसज्ज : केंद्र सरकार

India’s medical care facility fully equipped in case of third corona wave: Central Government

केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले की, भारताची वैद्यकीय पायभूत सुविधा पूर्णपणे सुसज्ज आहे आणि संभाव्य कोव्हिड-१९ च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयार आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरावर वैद्यकीय पायाभूत सुविधा पूर्णपणे सुसज्ज आहे, मग कोरोनाची लाट येवो अथावा न येवो. तथापि, त्यांनी पुढे सांगितले की लोकांनी सर्व आवश्यक दक्षता पाळली पाहिजे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या अस्तित्वाबद्दल इशारा देणारा ‘कोव्हिड अलार्म’ उपकरण विकसित – 

महत्वाचे म्हणजे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी शक्यता वर्तविली आहे की, भारतात ऑक्टोबरपर्यंत संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ञांद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की, भारत तिसऱ्या लाटेचा सामना दुसऱ्या लाटेहून अधिक चांगल्याप्रकारे करेल. या सर्वेक्षणात ४० आरोग्य विशेषज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, साथीच्या रोगांचे तज्ज्ञ आणि वायरोलॉजिस्ट यांचा समावेश होता.

८० टक्के लसीकरणाद्वारे कोव्हिड-१९ व्हेरिएंट्सची जोखीम कमी केली जाऊ शकते : डब्ल्यूएचओ – 

३ ते१७ जूनदरम्यान करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ८५ टक्के किंवा २४ पैकी २१ तज्ज्ञांचे म्हणणे होते की तिसरी लाट ऑक्टोबरपर्यंत येईल. तीन इतर तज्ज्ञांनी ही लाट ऑगस्टमध्ये येण्याची भविष्यवाणी केली तर १२ जणांनी सप्टेंबरमध्ये सुरूवात होण्याची शक्यता वर्तविली. इतर तज्ञांनी सांगितले की तिसरी लाट नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान येऊ शकते.
Coronavirus Third Wave: Center said- If the third wave of corona comes, then India is fully prepared to face it.


तिसऱ्या लाटेचा मुलांवर अधिक प्रभाव पडण्याची शक्यता कमी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर प्रभाव किती? : डब्ल्यूएचओ आणि एम्स सर्वेक्षण

Social Media