रिलायन्स होम फायनान्स कंपनीला खरेदी करण्यासाठी मुंबईतील एका कंपनीने लावली सर्वात मोठी बोली….

नवी दिल्ली : अनिल अंबानी याची कंपनी रिलायन्स होम फायनान्स (Reliance Home Finance) खरेदी करण्यासाठी मुंबईतील एका कंपनीने सर्वात मोठी बोली लावली आहे. दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेअंतर्गत विकल्या जाणाऱ्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीसाठी Authum Infrastructure and Investment ने २,९०० कोटी रूपयांची योजना सादर केली आहे. या प्रक्रियेत ही कंपनी सर्वात मोठी बोली लावणारी दावेदार आहे. रिलायन्स होम फायनान्स रिलायन्स कॅपिटलची होम फायनान्स यूनिट आहे.

बँकांच्या ग्राहकांसाठी आरबीआयची मोठी घोषणा…. – 

सुत्रांच्या माहितीनुसार आथम कंपनीची योजना लागू झाल्यास बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) नेतृत्वात कंपनीला कर्ज देणाऱ्या वित्तीय कर्जदत्यांना २,५८७ कोटी रूपये सुरूवातीला आणि ३०० कोटी रूपये १ वर्षाच्या आत मिळतील. वित्तीय कर्जदात्यांच्या मतदानात आथम कंपनीच्या प्रस्तावाला इतर प्रस्तावांच्या तुलनेत अधिक मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावांवर मतदान ३१ मे ते १९ जूनपर्यंत सुरू होते. यामध्ये मुल्यानुसार ९१ टक्के कर्जदात्यांनी भाग घेतला होता.

देशाच्या विदेशी चलन साठ्यात ६०० अब्ज डॉलर्सचा विक्रम – 

सुत्रांनुसार, गैर बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) ऑथमच्या प्रस्तावाला पालन करण्याच्या दृष्टीने अधिक सोपे आणि सर्व भागधारकांच्या दृष्टीकोनातून सर्वात चांगले असल्याचे मानले आहे. सुत्रांनी म्हटले आहे की, यावर अजूनही काही करदात्यांची मंजूरी प्रलंबित आहे. रिलायन्स होम फायनान्स च्या (RHF) या शर्यतीत एआरईएस एसएसजी, ऍसेट्स केअर एँड रीकंस्ट्रक्शन एंटरप्रायझेस लिमिटेड, एव्हेन्यू कॅपिटल या कंपन्यांचा देखील समावेश आहे. एव्हेन्यू ने आपल्या प्रस्तावात एआरसीआयएल आणि कॅप्री ग्लोबल कॅपिटला समाविष्ट केले आहे.

या कंपनीच्या दिवाळखोर निराकरणाद्वारे रिलायन्स समुहाची वित्तीय कंपनी रिलायन्स कॅपिटलवरील कर्जाचा बोझा ११,२०० कोटी रूपयांनी कमी होईल. अनिल अंबानी यांच्यावर फेब्रुवारी २०२० पर्यंत ३०.५ कोटी डॉलर्सचे कर्ज होते तर, त्यांची मालमत्ता केवळ ८.२ कोटी डॉलर्स होती.
Big deal came to buy this company of Anil Ambani, offered so much money.


स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवी वाढल्याच्या वृत्ताचे वित्तमंत्रालयाने केले खंडन! – 

स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवी वाढल्याच्या वृत्ताचे वित्तमंत्रालयाने केले खंडन!

Social Media