टॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याच्या वृत्तावरून रकुल प्रीत सिंगने व्यक्त केला संताप!

नवी दिल्ली : Rakul Preet Singh : आपल्या अभिनयाद्वारे लोकांचे मन जिंकणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh)सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या दरम्यान एका माध्यमाने त्यांच्या अहवालात असा दावा केला आहे की या अभिनेत्रीकडे टॉलिवूडमध्ये काहीच काम नाही. अहवालानुसार रकुल प्रीत सिंगने एका मुलाखतीत म्हटले होते की, ती बॅक-टू-बॅक अनेक प्रोजेक्ट्सच्या कामांमध्ये व्यस्त आहे आणि तेलगू चित्रपटांसाठी तिच्याकडे कोणत्याही ऑफर्स नाहीत. रकुलला बॉलिवूडमध्ये व्यावसायिक चित्रपट करण्याची इच्छा आहे आणि ती योग्य संधीची वाट पाहत आहे.

रकुल प्रीत सिंगने टॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याच्या वृत्ताचे केले खंडन..

Rakul Preet Singh refuted reports that he was not getting work in Tollywood.

आता अभिनेत्रीने तिच्या अधिकृत ट्विटरवर त्या आर्टिकलची (अहवालाची) लिंक शेअर करत या गोष्टीचे खंडन केले आहे. तिने ट्विटरवर लिहिले आहे की, ‘मला आश्चर्य वाटते की मी असे कधी म्हणाले. मित्रांनो एका वर्षात केवळ ३६५ दिवस असतात आणि जर तुम्ही ६ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करत असाल, जे मी सध्या करत आहे. तर कृपया माझ्या टीमची मदत करा.’

कृष्णा अभिषेकने फोटो शेअर करत ‘द कपिल शर्मा’ शो परत येणाचा दिला इशारा… – 

रकुल प्रीत सिंग तेलगू चित्रपटांमध्ये शेवटी सन २०२० मध्ये दिसून आली होती. या चित्रपटात रकुल प्रीत सिंगसोबत साउथ अभिनेता नितिन आणि अभिनेत्रा प्रिया प्रकाश वरियर ने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. तिच्या सध्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती यावर्षी सलग अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ती लवकरच इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट ‘थॅँक गॉड’ मध्ये अजय देवगनसोबत दिसून येणार आहे. याशिवाय अजय देवगनसोबतच ‘मेडे’ चित्रपटात देखील दिसून येणार आहे. सोबतच ही अभिनेत्री आयुष्यान खुरानासोबत ‘डॉक्टर जी’ या चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.
Rakul Preet Singh got angry on the report of not getting any work in Tollywood, said- ‘When did I say this’.


सोशल मीडियावरील पोस्टमुळे स्वरा भास्कर विरोधात FIR, धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप! –

स्वरा भास्कर विरोधात धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप!

Social Media