Beauty Tips : वाढत्या वयाचा परिणाम कमी करायचा आहे, मग दिनचर्येत करा ‘या’ गोष्टींचा समावेश!

Beauty Tips : गाजराच्या बियांचे तेल (carrot seed oil) त्वचेची सूज कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून वापरले जात आहे. परंतु हे तेल सौंदर्य उत्पादन म्हणून देखील त्वचेसाठी खूप चांगले असल्याचे मानले जाते. या तेलाने मसाज केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतात आणि दीर्घकाळापर्यंत तरूण दिसण्यास मदत होते. हे कोरियन महिलांच्या निरंतर सौंदर्याचे रहस्य असल्याचे देखील मानले जाते.

Beauty Tips : दीर्घकाळापर्यंत तरूण दिसण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

गाजराच्या बियांच्या तेलात अनेक प्रकारचे एँटीऑक्सीडंट्स आढळतात. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेल्या या तेलात एँटी-बँक्टेरियल आणि एँटी-फंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. याचा त्वचेवर वापर केल्याने ऍलर्जी, मुरूमे, सूज यांसारख्या समस्या दूर होतात. जाणून घेऊयात या तेलाचे अनेक फायदे आणि याचा वापर करण्याची पद्धत….

beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे – 

१. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि सुरकुत्या व डाग-धब्बे मिटविण्यासाठी तुम्ही या तेलाचे २-३ थेंब घेऊन इतर कोणत्याही तेलात मिसळा हे एकत्र करून चेहऱ्यावर मसाज करा, सुमारे १५ मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

Beauty-Tips
२. हे तेल चिकणमातीच्या फेसमास्क मध्ये मिसळून याचा वापर केला जाऊ शकतो. या मास्कमध्ये कॅरट सीड ऑइलचे २-३ थेंब टाका आणि मास्क चेहऱ्यावर लावा. चेहरा कोरडा झाल्यानंतर स्वच्छ धुवा.

३. मेंदूला शांत करण्यासाठी या तेलाचे २-३ थेंब एका कॉटनमध्ये घ्या आणि हे कॉटन उशाजवळ ठेवा. याचा गोड सुगंध मनाला विश्रांती देतो.

Beauty-Tips

४. जर तुमचे केस कोरडे आणि निर्जिव असतील तर तुम्ही कॅरट सीड ऑइलचे काही थेंब तुमच्या कंडिशनरमध्ये मिसळू शकता. यामुळे केस मऊ आणि चमकदार राहतील.

५. त्वचेवर कोणत्याही प्रकारची जखम, पुरळ, डाग इत्यादी असल्यास या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. या तेलात एँटी बॅक्टेरियल आणि एँटी-फंगल गुणधर्म असल्याने हे खुप प्रभावी असल्याचे सिद्ध होते.

Beauty-Tips

वापरण्याची पद्धत (of using)- कॅरट सीड ऑइलचा वापर थेट केला जात नाही. हा एक एसेंशियल ऑइल आहे त्यामुळे याचा वापर इतर तेलात जसे की ऑलिव्ह ऑइल, नारळाचे तेल, जोजोबा किंवा बदामाच्या तेलासोबत केला पाहिजे.
Beauty Tips: If you want to neutralize the effect of aging, then include this one thing in your routine.


Beauty Tips : चेहऱ्याचे सौंदर्य मृत पेशींमुळे खराब झाले आहे, तर मग जाणून घ्या हे उपाय….. 

Beauty Tips : चेहऱ्यावरील मृतपेशी नष्ट करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

Social Media