पर्यटकांना पर्यटन स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्याची संधी, नैनीतालमध्ये दीड महिन्यानंतर पुन्हा रज्जूमार्ग सुरू…..

नैनीताल : कोव्हिड-१९(Covid-19) ची दुसरी लाट ओसरल्यानंतर पर्वतीय शहरात पर्यटन उपक्रम सुरू झाले आहेत. कोव्हिड कर्फ्यूमध्ये पर्यटकांसह स्थानिक लोकांसाठी कुमाऊं विकास महामंडळाने रज्जूमार्ग (रोप-वे) सुविधा गुरूवारपासून पुन्हा सुरू केली आहे. यामुळे महामंडळाची कमाई वाढण्यासह पर्यटकांना पर्यटन स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्याची संधी मिळाली आहे.

कोव्हिड-१९ संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी रज्जूमार्ग (रोप-वे) (ropeway started)सुविधेचे कामकाज केएमव्हीएन ने खंडित केले होते. महामंडळाचे जीएम एबी बाजपेयी यांनी सांगितले की, नैनीतालच्या सह न्यायदंडाधिकाऱ्यांच्या वतीने निर्बंघ शिथिल झाल्यानंतर रज्जूमार्ग सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रोप-वे चे व्यवस्थापक शिवम शर्मा यांनी सांगितले की ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी पर्यटकांची संख्या सध्या कमी आहे, अपेक्षा आहे की हळूहळू परिस्थिती सुधारेल.

सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र मानसरोवर तलाव –

रोप-वे चे संचालन सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत केले जाईल. आणि प्रत्येक फेरीनंतर रोप-वे ट्रॉली नियमितपणे स्वच्छ (सॅनिटाइझ) करणे बंधनकारक असेल. तसेच रोप-वे मध्ये बसलेला व्यक्ती आणि चालकाला मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. रोप-वे मध्ये यात्रा करण्यापूर्वी सर्व व्यक्तींची थर्मल स्कॅनिंग करणे देखील अनिवार्य असेल.

कोव्हिड १९ च्या सर्व सुरक्षा मानकांचे पालन करण्याबरोबरच भारत सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाद्वारे वेळोवेळी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे देखील बंधनकारक असेल.
Operation of ropeway started again after one and a half months in Nainital, these things will have to be kept in mind.


पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणी कायम, मदतीचा आदेश अजूनही प्रलंबित….

जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा इंद्रपुरी धरण बनत आहे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र! –

बिहारच्या रोहतासमधील इंद्रपुरी धरण बनत आहे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र!

Social Media