केआरके ने सलमान खान विरूद्ध कोणतेही वक्तव्य किंवा पोस्ट करू नये : कोर्टाचा अंतरिम आदेश

मुंबई : सुपरस्टार सलमान खानशी (salman khan) वैर घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून केआरके (कमाल राशिद खान) चर्चेत होता. केआरके ने सलमान खान च्या चित्रपटाविषयी बरेच काही म्हटले होते आणि नकारात्मक रिव्यू देखील दिला होता. एवढेच नव्हे तर केआरके ने सलमानवर अनेक वैयक्तिक आरोप देखील केले होते. त्यानंतर सलमान खानच्या टीमने केआरकेविरूद्ध मानहानीचा दावा ठोकला होता. बुधवारी सलमान खानने केआरकेविरूद्ध केलेल्या मानहानी प्रकऱणाची सुनावणी झाली.

महाभारतावर आधारित चित्रपटात रिया चक्रवर्ती द्रौपदीच्या भूमिकेत? – 

सलमान खानने दाखल केलेल्या मानहानी खटल्याचा अंतरिम आदेश पारित करण्यात आला. शहर दिवाणी न्यायालयाचे (सिटी सिव्हिल कोर्ट) न्यायाधीश सी.व्ही मराठे यांनी सांगितले की, ‘प्रतिष्ठा आणि मान चांगल्या व्यक्तीसाठी सुरक्षा आणि स्वातंत्र्यासारखे आहे.’ यासह त्यांनी अभिनेता आणि चित्रपट समीक्षक केआरके ला सलमान खानविरूद्ध कोणतेही वक्तव्य, व्हिडीओ किंवा अपमानास्पद गोष्टी करण्याविरूद्ध अंतरिम आदेश जारी केला आहे. या आदेशाअंतर्गत केआरकेला आता सलमान खान, त्यांच्या कुटुंबाविषयी, दिग्दर्शक, भागधारक किंवा सलमानच्या कंपनीविरूद्ध नाव घेण्यास मनाई आहे.

रिया चक्रवर्ती मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत अव्वल स्थानी! – 

तर या संपूर्ण प्रकरणानंतर केआरके ने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘अद्याप माझ्याकडे कोर्टाच्या आदेशाची प्रत आलेली नाही. मीडिया अहवालाद्वारे मला असे समजले आहे की न्यायालयाचा आदेश आहे की मी सलमान खानविरूद्ध काहीच बोलू नये. मी कधीच त्याच्याविरूद्ध बोललो नाही आणि यापूढे देखील बोलणार नाही. परंतु मी प्रामाणिकपणे चित्रपटांचे रिव्यू करत आहे आणि करत राहणार.’
Khan vs Khan: KRK will not be able to post anything against Salman, court issues interim order.


‘दोस्ताना2’  चित्रपटात कार्तिक आर्यनच्या जागी दिसणार अक्षय कुमार  –

कार्तिक आर्यनला बाहेर काढल्यानंतर ‘दोस्ताना-2’ चित्रपटामध्ये अक्षय कुमारची वर्णी!

डिजिटल पदार्पणासाठी अजय देवगन तयार –

डिजिटल पदार्पणासाठी अजय देवगन तयार, इंटेन्स पोलिसाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला…..

Social Media