पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ‘फागू’ हे ठिकाण सर्वोत्तम!

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचा दर घटल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन समाप्त करण्यात आला आहे. याशिवाय पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे पर्यटकांना फिरण्याची संधी मिळाली आहे. पर्यटक पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आखत आहेत. तथापि, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. तर कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने लोकांची चिंता आणखी वाढविली आहे. परंतु आवश्यक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यात मदत होईल. जर तुम्ही येत्या काही दिवसात सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर, फागुला फेट द्या. चला तर मग पर्यटन स्थळ फागूविषयी जाणून घेऊयात….

फागू (Fagu)शब्दाची निर्मिती फॉग(Faug) म्हणजेच धुक्यापासून बनली आहे. तज्ञांच्या मते, हिवाळ्यात तापमान बरेच कमी होते. याशिवाय धुके देखील खूप वाढते. त्यामुळे या ठिकाणाचे नाव फागू असे ठेवण्यात आले आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची २४५० मीटर आहे. या ठिकाणाहून पर्यटक हिमालयाचे सौंदर्य पाहू शकतात. हे ठिकाण शिमल्यापासून १८ किलोमीटर आणि कुफरीपासून केवळ ६ किलोमीटर दूर आहे.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये फागूचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. बर्फाच्या चादरीने झाकलेले पर्वत खूप सुंदर दिसतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात देखील हवामान आनंददायी असते. यासाठी मे ते ऑक्टोबर दरम्यान मोठ्या संख्येने पर्यटक फागू स्थळाला भेट देतात. जर तुम्हालाही स्नोफॉल म्हणजेच हिमवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर हिवाळ्याच्या दिवसांत फागू स्थळाला भेट द्या.

फागूचे सर्वात जवळचे विमानतळ चंदीगड आहे. यासाठी सर्वात प्रथम दिल्लीहून चंदीगडला जावे लागेल. त्यानंतर चंदीगडहून विमानाने फागूला पोहोचू शकता. जर तुम्हाला रेल्वेने फागुला जायचे असेल तर तुम्ही शिमल्याला जावू शकता. शिमला ते फागु हे अंतर फक्त 18 कि.मी. आहे.

Fagu is the perfect destination to visit around Delhi during the rainy season.


नैनीतालमध्ये दीड महिन्यानंतर पुन्हा रज्जूमार्ग सुरू….. –

पर्यटकांना पर्यटन स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्याची संधी, नैनीतालमध्ये दीड महिन्यानंतर पुन्हा रज्जूमार्ग सुरू…..

Social Media