Beauty Tips : मऊ, तरूण आणि चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा फाटलेल्या दुधाचा सीरम!

Sour Milk Serum : फाटलेल्या दूधापासून पनीर आणि दही बनविले जाते परंतु त्याचे पाणी फेकून न देता त्याच्यापासून त्वचेचे सीरम तयार करा. दूध आणि दूधापासून बनलेले पदार्थ केवळ आरोग्यासाठीच उपयुक्त नसून ते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात बऱ्याचदा स्वयंपाकघरात दूध ठेवून आपण विसरून जातो आणि दूध फाटते, हे फाटलेले दूध निरूपयोगी असल्याचे समजून टाकण्याऐवजी त्याचा वापर त्वचेसाठी करा.

फाटलेल्या दूधाच्या पाण्यात लॅक्टिक ऍसिड आणि अनेक पोषक घटक असतात, जे त्वचेसाठी खूप उपयोगी असतात. फाटलेल्या दूधाच्या पाण्यापासून सीरम तयार केले जाऊ शकते, जे त्वचेला खोलवर स्वच्छ करते. या घरगुती सीरमचा वापर केल्याने त्वचा मऊ, तरूण आणि चमकदार बनते. हे सीरम लावल्याने चेहऱ्यावरील मृतपेशी दुरूस्त होतात आणि चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होतो, याशिवाय चेहऱ्याचा ओलावा कायम राहतो. या सीरमचा वापर केल्याने चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. एवढेच नाही तर चेहऱ्यावरील डागांपासून देखील मुक्ती मिळते. जाणून घेऊयात फाटलेल्या दुधापासून सीरम कसे तयार करावे आणि याचा वापर कसा करावा.

कृती (recipe) :

एका भांड्यात दूध गरम करा, त्यानंतर या दूधात लिंबाचे रस मिसळा. दूध फाटल्यानंतर हे गाळून एका बाटलीत भरा. या पाण्यात ग्लिसरीन आणि हळद मिसळा. हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा आणि या सीरमचा वापर २ ते ३ दिवसांसाठी करू शकता.

सीरम कसे वापरावे (How to use Serum) :

Sour-Milk-Serum

फाटलेल्या दूधापासून तयार केलेल्या सीरमचा वापर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर करू शकता. हे वापरण्यापूर्वी चेहऱ्यावर फेसवॉशचा वापर करून चेहऱ्यावरील धुळ स्वच्छ करा. चेहऱ्यावरील धुळ स्वच्छ केल्यानंतर कॉटनच्या मदतीने हे सीरम लावा. सीरम हातावर घेऊन चेहऱ्याला २ ते ५ मिनिटापर्यंत मसाज करा. रात्रभर चेहऱ्याला सीरम लावून झोपू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
Sour Milk Serum: If you want to get soft, youthful and glowing skin, then use sour milk serum.


Beauty Tips : त्वचेचे सौंदर्य वाढविण्यात तमालपत्र प्रभावी! –

Beauty Tips : चेहऱ्याचा रंग आणि चमक वाढविण्यासाठी करा तमालपत्राचा वापर!

Social Media