नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसची किंमत वाढत आहे. याचा परिणाम लवकरच घरगुती खनन क्षेत्र आणि उत्पादित गॅसवर देखील दिसून येईल. सरकारद्वारे यावर्षी १ ऑक्टोबर रोजी घरगुती गॅसच्या नवीन किंमती निश्चित केल्या जातील. तेल-गॅस खाण क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी ऑइल एँड नॅचरल गॅस कार्पोरेशनने (ओएनजीसी) सांगितले आहे की, यावेळी त्यांच्या किंमतीत ६० टक्क्यांनी वाढ होणे जवळपास निश्चित आहे. ओएनजीसीचे सीएमडी सुभाष कुमार यांनी कंपनीच्या आर्थिक वर्षाच्या परिणामांची माहिती देताना सांगितले की, जानेवारी-मार्च २०२१ मध्ये ओएनजीसी ने ५८.०५ डॉलर प्रति बॅरलच्या दराने कच्च्या तेलाची विक्री केली आहे.
तर मागील आर्थिक वर्षीच्या याच तिमाहीत विक्री दर प्रति बॅरल ४९.०१ डॉलर होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्या सहा महिन्यांमध्ये कच्चा तेल आणि गॅसच्या किंमती खाली आल्याने कंपनीच्या महसुलावर परिणाम झाला होता. परंतु सध्या किंमती देखील वाढत आहेत आणि सरकारने ग्राहकांना दिले जाणारे अनुदान (सब्सिडी) देखील संपवले आहे.
या अनुदानाचा एक भाग सरकारी तेल कंपन्यांना घ्यावा लागतो. तसे गेल्या तिमाहीत गॅसचा दर खूपच कमी होता. सरकार दर सहा महिन्यांनी घरगुती गॅसची किंमत निश्चित करते. जानेवारी-मार्च या तिमाहीत गॅस दर १.७९ डॉलर प्रति एमएमबीटीयू (प्रति दशलक्ष ब्रिटीश थर्मल यूनिट) होता.
कच्चे तेल महाग झाल्याने आणि घरगुती ग्राहकांना दिले जाणारे पेट्रोलियम अनुदान समाप्त झाल्याने मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत ओएनजीसी ला ६,७३४ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कुमार यांनी सांगितले की, कंपनी यावर्षी २९,५०० कोटी रूपयांची नवीन गुंतवणूक करेल.
New prices of domestic gas will be determined on October 1, the price is likely to increase by 60 percent: ONGC