जिनेव्हा : लसीच्या कमतरतेविषयी जागतिक आरोग्य संस्थेने (WHO)सर्व श्रीमंत देशांना गरीब देशांसाठी लस उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. संस्थेने सांगितले की, एकीकडे गरीब देशांमध्ये लसीची कमतरता आहे तर, श्रीमंत देशांमध्ये अशा तरूणांना लस दिली जात आहे, ज्यांना यावेळी कोरोनाचा अधिक धोका नाही. हे विधान करत संस्थेने या जागतिक अपयशाचा निषेध केला आहे.
डब्ल्यूएचओ चे महासंचालक टेड्रोस एडनॉम घेब्येयिसय (WHO director-general Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सांगितले की, आफ्रिकेत कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. येथे गेल्या आठवड्यात ४० टक्के संसर्गाची प्रकरणे आणि मृत्यूचा आकडा वाढला आहे. येथे मागील आठवडा खूप धोकादायक होता कारण जागतिक स्तरावर कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे.
त्यांनी एका पत्रकार परिषदेत असे म्हटले की, जग हे अपयशी ठरत आहे, जागतिक समुदाय म्हणून आपण अपयशी ठरत आहोत. एवढेच नाही एडनॉम घेब्येयियस यांनी कोरोनाची तुलना एचआयव्ही एड्स संकटाशी केली. त्यांनी सांगितले की, एचआयव्ही एड्स संकटादरम्यान काही लोकांनी असा तर्क लावला होता की आफ्रिका देश जटिल उपचारांचा वापर करण्यात अक्षम आहे. सध्या अशीच काहीशी समज श्रीमंत देशांची आहे. टेड्रोस यांनी सांगितले की, या कठीण काळात लस पुरवठ्याची समस्या आहे. अशा परिस्थितीत आम्हाला केवळ लसींची गरज आहे.
याव्यतिरिक्त डब्ल्यूएचओद्वारे असे म्हटले आहे की, या प्रकारच्या फरकांमुळे आपल्या जगाची अयोग्यता उघडकीस येत आहे कारण गरीब देश अन्याय, असमानता यांचा सामना करीत आहेत. तर डब्ल्यूएचओचे वरिष्ठ आपत्कालीन तज्ञ माइक रयान यांनी सांगितले की, अनेक विकसनशील देश कॉलरा, पोलिओ सारख्या संसर्गजन्य आजारांविरूद्ध त्याच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात औद्योगिक देशांच्या तुलनेत खूप चांगले आहेत.
WHO urges rich countries to provide vaccines to poor countries – know what else Tedros Adhanom Ghebreyesus said