Beauty Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपचार करेल अंड्याचा मास्क; जाणून घ्या याची प्रक्रिया….

नवी दिल्ली, Egg Masks For Hair : अंडा केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नसून, केसांसाठी देखील खूप उपयोगी आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असते, यामध्ये व्हिटॅमिन बी१२, बायोटिन, रिबोफ्लाविन, थियामिन आणि सेलेनियम देखील उपलब्ध असते. हे सर्व व्हिटॅमिन केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. अंड्यामुळे केवळ केसांची वाढ होण्यास मदत होत नाही तर, केस गळती देखील थांबते. तसेच केसांची चमक वाढते आणि केसांना हानी होण्यापासून प्रतिबंधित करते. अंड्याचा मास्क केसांना नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझ करतो. तर मग जाणून घेऊयात अंड्याचा कोणता-कोणता मास्क केसांना वापरावा…

कोरफड (Aloe vera)

Beauty-Tips

कोरफडचा (Aloe vera) वापर केवळ त्वचेसाठी केला जात नाही, तर केसांसाठी देखील केला जातो. कोरफड केसांना मजबूत करणारा घटक म्हणून कार्य करतो. अंडा, कोरफड आणि ऑलिव्ह ऑइलचा मास्क केसांना मजबूत करतो.

Beauty Tips : त्वचेचे सौंदर्य वाढविण्यात तमालपत्र प्रभावी! – 

याचा वापर कसा करावा (HOW TO USE)-

अंड्याचा-पिवळा-बलक

हा मास्क बनविण्यासाठी एका भांड्यात २-३ चमचे अंड्याचा पिवळा बलक आणि ४-५ मोठे चमचे कोरफड जेल एकत्र करा. हा मास्क वापरण्यापूर्वी १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल १० सेकंद गरम करा आणि हे तेल केसांच्या मुळाशी लावा. हे अर्धातास तसेच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ करा.

Beauty Tips : चेहऱ्याचे सौंदर्य मृत पेशींमुळे खराब झाले आहे, तर मग जाणून घ्या हे उपाय….. – 

अंडी, केळी आणि मधाचा मास्क (Egg, Banana and Honey Mask)-

Beauty-Tips

अंडी, केळी आणि मधाचा मास्क केसांच्या अनेक समस्यांवर उपचार करेल. अंड्यामुळे केसांना पोषण मिळते, तर केळी, मध आणि अंड्याच्या मास्कमुळे केसांचा नैसर्गिक ओलावा वाढतो.

beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे – 

मास्क कसा तयार करावा (How to prepare the mask)-

Beauty-Tips

हा मास्क बनविण्यासाठी एक अंडा, १ मॅश केलेला केळा, ३ चमचे दूध, ३ चमचे मध आणि ५ चमचे ऑलिव्ह ऑईल एकत्र करून चांगल्याप्रकारे मिसळा. त्यानंतर हा मास्क तुमच्या मुळांना आणि केसांना हलक्या हाताने लावा. एक तासांनी केस शाम्पूने स्वच्छ करा.

Egg Masks For Hair: Egg mask will cure all hair problems, know how!


Beauty Tips : मऊ, तरूण आणि चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा फाटलेल्या दुधाचा सीरम! –

Beauty Tips : मऊ, तरूण आणि चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा फाटलेल्या दुधाचा सीरम!

Beauty Tips : घरगुती उपाय करून ओठांवर पडलेले काळे डाग करा दूर!  –

Beauty Tips :ओठांवर पडलेले लिपस्टिकचे डाग दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

Social Media