माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांच्या बदल्यांमध्येही सहभाग : ईडी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सहभाग वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतरांच्या बदल्यांमध्येही होता अशी कबुली देशमुख यांचे तत्कालीन खाजगी सचिव संजीव पालांडे यांनी दिली असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी ने आज विशेष न्यायालयासमोर दिली आहे.

संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या देशमुखांच्या सहकाऱ्यांचा ईडी कडील ताबा आज विशेष न्यायालयाने 6 जुलै पर्यंत वाढविला त्यावेळी न्यायालयासमोर ईडी ने ही माहिती दिली.

देशमुख यांच्या कुटुंबियांकडून 11 कंपन्या चालविण्यात येत असून देशमुख कुटुंबियांच्या निकटवर्तीयांकडून आणखी 13 कंपन्या चालविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे असे आपल्या तपासात निष्पन्न झाल्याचे ईडि ने आज न्यायालयाला सांगितले. ज्यावेळी आम्ही या कंपन्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली त्यावेळी ही बाब आढळून आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. याशिवाय अटकेत असलेला आरोपी सचिन वाझे, काही बार मालक यांनी दिलेले जवाब , या सोबतच देशमुख यांच्या निवासस्थानी  छापे मारल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या बाबींवरून 4 कोटी 70 लाख रुपये इतकी रक्कम देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे यांच्या कडे देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

संजीव पालांडे यांनी ईडी ला दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस अधिकारी, विशेषतः आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये देशमुख यांचा थेट हस्तक्षेप होता अशी माहिती ईडी ने आज न्यायालयासमोर दिली.

The Directorate of Recovery, ed, today told a special court that Deshmukh’s then private secretary Sanjeev Palande has admitted that former state home minister Anil Deshmukh was involved in transfers of senior police officers as well as others.


कोरोना काळातील आंदोलने सरकार का रोखू शकत नाही, उच्च न्यायालयाचे खडे बोल

Social Media